Tony Mirchandani Passes Away : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते टोनी मिरचंदानी यांचे निधन झालं आहे. ते 'कोई मिल गया' आणि 'गदर' यांसारख्या हिट चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध होतो. ते दिर्घकाळ आजाराने त्रस्त होते. त्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. टोनी मिरचंदानी यांचं 4 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी अभिनेत्री हेलेना ल्यूक यांच्या निधनानंतरच्या इंडस्ट्रीमध्ये दुसऱ्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. टोनी मिरचंदानी यांनी आपल्या संस्मरणीय अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला आहे. त्यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका नेहमीच प्रभावी ठरल्या. अभिनेते टोनी मिरचंदानी यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोकसागरात बुडाला आहे.


ज्येष्ठ अभिनेते टोनी मिरचंदानी यांचं निधन


बॉलिवूड अभिनेता टोनी मिरचंदानी 'कोई मिल गया' आणि 'गदर' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे सोमवारी निधन झाले. फिल्म इंडस्ट्रीतील कारकिर्दीत त्यांनी अनेक सहाय्यक भूमिकांमध्ये वास्तववादी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. टोनी मिरचंदानी नेहमीच त्यांच्या संस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे. दिवंगत अभिनेते टोनी मीरचंदानी यांच्या पश्चात पत्नी रमा मीरचंदानी आणि मुलगी श्लोका मीरचंदानी असा परिवार आहे.


दिर्घकाळ आजारपणामुळे निधन


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते टोनी मिरचंदानी दीर्घकाळ आजारी होते, त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहते, त्यांचे मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. केवळ चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठीच नव्हे तर त्यांच्या ज्वलंत व्यक्तिमत्त्वासाठी आणि सकारात्मक प्रभावासाठीही ते ओळखले जायचे. टोनी मिरचंदानी यांच्यासाठी प्रार्थना सभेचे  आयोजन करण्यात आले आहे.


या चित्रपटांमधून मिळाली ओळख


टोनी मिरचंदानी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. 'कोई मिल गया' चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. 'गदर' चित्रपटामधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप पाडली. त्यांच्या कामातून त्याची कलेची आवड दिसून आली. टीव्ही जगतातही ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


17 वर्षांपूर्वीचा चित्रपट अचानक OTT वर ट्रेंडमध्ये, एक कोटीहून अधिक तिकीटांची विक्री; IMDb रेटिंगही जास्त