Athiya Shetti Birthday:सिनेमा आणि क्रिकेट यांचं फार जुनं नातं आहे. बॉलिवूडच्या कित्येक नट्यांनी क्रिकेटपटूंना आपलं हृदय दिलं आहे. सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिनं चित्रपटात फार काम केलं नसलं तरी तिच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे ती कायमच चर्चेत असते. क्रिकेटर के एल राहुल आणि अथियाची लव्हस्टोरीही याच चर्चेचा भाग आहे. अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. या निमित्तानं जाणून घेऊयात तिच्याविषयी काही खास गोष्टी...
बॉलिवूड नगरी भल्याभल्यांना आपल्या तालावर नाचायला लावणारी आहे. या नगरीत कोणाचं नशीब कसं पालटतं आणि संधी मिळते. कोण संधीचं सोनं करत हीट ठरतं आणि कोण फ्लॅाप ठरतं हे काळच ठरवतो. नऊ वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या एका नटीनं या नगरीत पाऊल ठेवलं ते वडिलांचा हात धरत. पण नऊ वर्षात साधारण पाच सहा चित्रपट केले तेही फारसे चालले नाहीत. पण केएल राहूलसोबत असणारी तिची रिलेशनशीप आणि लव्हस्टोरी कशी आहे याची सगळीकडेच चर्चा झाली.
दोघांची भेट कशी झाली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लव्हस्टोरी सुरु झाली त्यांच्या एका म्यूचवल मित्रामुळे. पुढे या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. त्याचवेळी अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनाही अथिया आणि राहूलच्या नात्याविषयी विचारले असता त्यांनीही यावर बोलणे टाळले.
२०२१ मध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी अथियाही सोबत
2021 मध्ये, जेव्हा केएल राहुल इंग्लंड कसोटी मालिका खेळण्यासाठी निघाला तेव्हा अथियादेखील त्याच्यासोबत गेली होती. या प्रकरणी दोघेही काहीही बोलले नसले तरी त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर अथियाच्या वाढदिवसानिमित्तच केएल राहुलने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.
दोन वर्षात बांधली लग्नगाठ
दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०२३ मध्ये जानेवारीत अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये आपल्या जवळच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासमवेत या दोघांनी लग्न केले. यावेळी या दोघांच्या आऊटफीटचीही चांगलीच चर्चा झाली होती. अथियाने डिझायनर अनामिका खन्ना यांचा निळसर गुलाबी चिकनकारी लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये फुलांची सजावट आणि भरतकाम होते. त्यानंदेखील तिच्यासारख्याच डिझाइनरने. भरतकाम केलेला लांब ओव्हरकोट आणि गळ्यात घातलेला दुपट्टा त्याने आपला लूक पूर्ण केला.