OTT Top 10 Movies List : बॉक्स ऑफिसवर 17 वर्षांपूर्वी एका चित्रपटाने धमाका केला होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये बंपर कमाई केली होती. 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटाची एक कोटीहून अधिक तिकीटे विकली गेली होती. बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करणार हा चित्रपटा आता रिलीज झाल्याच्या 17 वर्षांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. 17 वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटाला IMDb चांगलं रेटिंगही मिळालं आहे. 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे 'भूल भुलैया'.


17 वर्षांपूर्वी आलेला चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंड


भूल भुलैया 3 चित्रपट प्रदर्शित झाला असून चांगली कमाई करताना दिसत आहे. या फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट भूल भुलैया 2007 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटा अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. या चित्रपटात शाइनी आहुजा, अमिशा पटेल, मनोज जोशी, परेस रावल, राजपाल यादव हे कलाकार होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा तिप्पट अधिक कमाई करत निर्मात्यांना मालामान केलं होतं.


अभिनय आणि दिग्दर्शनाचं कौतुक


भूल भुलैया या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा जबरदस्त तडका लावला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तेव्हा या चित्रपटाची 1,17,86,000 तिकीटे विकली गेली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 17 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. भारतात ओटीटीवरील टॉप ट्रेंडिग लिस्टमध्ये भूल भुलैया चित्रपट सहाव्या स्थानावर आहे. IMDb वर या चित्रपटला 7 रेटिंग देण्यात आलं आहे. 


17 वर्षानंतरही चित्रपटाची क्रेझ कायम


अक्षय कुमारने 'भूल भुलैया' चित्रपटामध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर विद्या बालनच्या दमदार अभिनयाचेही खूप कौतुक झालं. रिलीजनंतर 'भूल भुलैया' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. विशेष म्हणजे 17 वर्षांनंतरही अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया' चित्रपटाची क्रेझ संपलेली नाही. आजही लोक हा चित्रपट खूप एन्जॉय करत आहेत. हा चित्रपट आजकाल OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर खळबळ माजवत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mission Chulbul Singham : 'चुलबुल पांडे'च्या चाहत्यांना रोहित शेट्टी दिवाळी भेट, 'मिशन चुलबुल सिंघम' चित्रपटाची घोषणा