Pakistani People Reaction On Sunny Deol Gadar 2 : सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाची भारतात चांगलीच क्रेझ आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तानी प्रेक्षकांनीदेखील हा सिनेमा पाहिला आहे. 


पाकिस्तानी प्रेक्षकांनी 'गदर 2' हा सिनेमा पाहिला असून सनी देओलला एक चॅलेंजदेखील दिलं आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. एकीकडे भारतात पाकिस्तानी कलाकारांवर (Pakistani Actors) बंदी घातली असली तर दुसरीकडे काही भारतीय सिनेमांवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सिनेप्रेमींमध्ये बॉलिवूड सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे. 'गदर 2' या सिनेमाला पाकिस्तानात बंदी असली तरी काही पाकिस्तानी सिनेप्रेमींनी हा सिनेमा पाहिला आहे. 






पाकिस्तानी सिनेप्रेमीचा 'गदर 2' (Gadar 2) पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे,"सनी देओलला पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण देतो. हिंमत असेल तर पाकिस्तानात येऊन त्याने इथल्या लोकांप्रमाणे वागावं. सनी देओलला पकडून मारले पाहिजे, सनी देओलशी पंगा घेण्याची हिंमत कोणात आहे?". 


'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा पाहिल्यानंतर पाकिस्तानी नागरिक भडकले आहेत. 'गदर 2' या सिनेमात भारत-पाकिस्तानातील वाद, युद्ध आणि प्रेम कहानी दाखवण्यात आली आहे. सनी देओलची पाकिस्तानमध्ये अजूनही दहशत आहे.  'गदर 2'मधील काही डायलॉगवर पाकिस्तानी नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. "अगर यहाँ के लोगों को दोबारा मौका मिले ना हिंदुस्तान मे बसने का, तो आधा से ज्यादा पाकिस्तान खाली हो जायेगा" या डायलॉगवर पाकिस्तानी नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. भारतात मात्र हा सिनेमा धमाका करत आहे. 'गदर 2' हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल असेही म्हटले जात आहे.


सनी देओलला पाकिस्तानात बंदी (Sunny Deol Banned in Pakistan)


बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी आहे. पाकिस्तानातील सिनेमागृहात अभिनेत्याचे सिनेमे दाखवले जात नाहीत. सनी देओलने देशप्रेमावर आधारित अनेक सिनेमे केले आहेत. तसेच पाकिस्तानाचा विरोध करणाऱ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. त्यामुळे त्याच्या सिनेमांचे शो न ठेवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.


संबंधित बातम्या


Sunny Deol Bungalow : सनी देओलच्या बंगल्यावरील लिलाव प्रक्रियेला अचानक स्थगिती, बँक ऑफ बडोदाकडून तांत्रिक कारणाची सबब