Rajinikanth: गेल्या काही दिवसांपासून अभिनेते  रजनीकांत (Rajinikanth) हे त्यांच्या जेलर या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती.यावेळी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर काही लोकांनी रजनीकांत यांना ट्रोल केले. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना नमस्कार केल्याबद्दल सांगितलं. 


काय म्हणाले रजनीकांत?


रजनीकांत हे तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर गेले होते. त्यादरम्यान त्यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची लखनौ येथे भेट घेतली. यावेळी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना नमस्कार केला. याबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रजनीकांत यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, 'माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी योगी किंवा संन्याशांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची माझी सवय आहे. त्यामुळे मी तेच केले आहे.'










रजनीकांत यांनी  अखिलेश यादव यांची देखील भेट घेतली तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जेलर हा चित्रपट लखनौमधील एका थिएटरमध्ये पाहिला. 


रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. 'जेलर' या चित्रपटातील रजनीकांत यांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच  मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  नेल्सन दिलीप कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


 'जेलर' या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील 'कावाला' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Rajinikanth: रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली; व्हिडीओ व्हायरल