Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होता आहे. सुभेदार या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यानं दिलेल्या सरप्राइजबाबत सांगितलं. 


दिग्पाल लांजेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये एक शिऱ्याची प्लेट आणि एक चिठ्ठी दिसत आहे. त्या चिठ्ठीवर लिहिलं आहे, 'दादा! तुमचे काम अनन्य साधारण आहे. तुमच्यामुळे आज महाराजांचा इतिहास समजत आहे. आगामी कामासाठी शुभेच्छा, तुमचा चाहता.'


दिग्पाल यांनी या चाहत्यानं दिलेल्या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कधी कधी आपण केलेल्या कामाची विलक्षण पावती मिळते. आज पुण्याहून मुंबई ला जात असताना फूड मॉल वर थांबलो. नाश्ता होईपर्यंत अचानक गोड शिऱ्याच्या डिशेस सर्व्ह केल्या गेल्या. आम्ही हे ऑर्डर केलं नाही हे म्हणेपर्यंत स्वतः मॅनेजर आला आणि त्यानं कुणीतरी हे तुमच्यासाठी ऑर्डर केलं आहे असं हसतमुखानं सांगत ही छोटीशी चिठ्ठी हातात ठेवली. त्यावरचा अगदी मनापासून लिहिलेला हा साधा सरळ संदेश वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं. कुणा अज्ञात मावळ्याचं हे प्रेम… आज मी हे केलं ते केलं म्हणून श्रेय घेण्यासाठीची धडपड मी अनेकदा पाहिली आहे. अशावेळी प्रेम व्यक्त करुन त्याचं समाधान मनात घेऊन समोरही न येणारी ही व्यक्ती चेहरा नसतानाही मनात कायम घर करुन राहील. त्यांच्या या बळ वाढवणाऱ्या अनाम प्रेमाचे आभार सामाजिक माध्यमातून मानतो आहे कारण ते त्यांच्यापर्यंत पोचतील याची खात्री आहे. तुम्ही रसिक मायबाप श्रीशिवराजअष्टक पूर्ण करण्यासाठी असेच पाठीशी उभे राहाल ही खात्री आहे. जय शिवराय'






सुभेदार हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी अजय पूरकर या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 


संबंधित बातम्या


Subhedar : 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; रिलीजआधीच 'वेड','बाईपण भारी देवा'ला मागे टाकत केला केला 'हा' रेकॉर्ड