Gadar 2 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वर्षांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत आहेत. 


'गदर 2' हा सिनेमा 2023 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. 2001 मध्ये 'गदर : एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर'मध्ये तारा सिंह आणि सकीनाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता 'गदर 2'मध्ये त्यांच्या मुलाला केंद्रीत करण्यात आले आहे. 


'गदर 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Gadar 2 Box Office Collection)


'गदर'ने ओपनिंग डेला अर्थात रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.1 कोटींची दणदणीत कमाई केली होती. पुढे वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 52 कोटींची कमाई सिनेमाने केली. अशाप्रकारे रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 135.18 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता 15 ऑगस्टला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


पहिला दिवस : 40.1 कोटी
दुसरा दिवस : 43.08 कोटी
तिसरा दिवस : 52 कोटी
एकूण कमाई : 135.18 कोटी


'गदर 2' या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'गदर 2' हा सिनेमा ठरला आहे. याआधी 'पठाण'ने 39 कोटी, 'केजीएफ'ने 50.35 कोटी, 'बाहुबली'ने 46.5 कोटी, 'टायगर जिंदा है'ने 45.53 कोटींची कमाई केली होती. तर 'गदर 2'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 52 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेलसह उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनिल शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सनी देओल आणि 'गदर 2'चे चाहते सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने सिनेमागृहात जात आहेत. सिनेमागृहात जल्लोष करतानाचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


'गदर 2' हुई जनता की...


#Gadar2HuiJantaKi हे सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. चाहते सिनेमागृहातील जल्लोषाचे फोटो आणि व्हिडीओ हा हॅशटॅग वापरुन सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सनी देओलनेही आपल्या कुटुंबियांसोबत हा सिनेमा पाहिला आहे.


संबंधित बातम्या


Gadar 2 screening: गदर-2 च्या स्पेशल स्क्रीनिंगला नाना पाटेकर यांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल