Pushpa 2 Poster Goes Viral : 'पुष्पा' चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती आता 'पुष्पा 2' ची. प्रेक्षकांना आता 'पुष्पा 2' ची प्रतिक्षा लागली आहे. 'पुष्पा' चित्रपटाने बाँक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटातील गाणे आणि डायलाॅगला देखील मोठी पसंती मिळाली होती. 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करुन त्यानं वेगळाच विक्रम आपल्या नावावर केला होता.
आता परत एकदा 'पुष्पा 2' च्या पोस्टरने एक अनोखा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या वेगवेगळ्या पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. इन्स्टावर तर अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या त्याच्या पुष्पा द रुल याचा नवा पोस्टर व्हायरल झाला आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियेनं एक नवा विक्रम केल्याचे दिसून आले आहे. त्यातील अल्लूच्या लूकनं तर चाहत्यांना वेडं केलं आहे. चाहत्यांनी मेकर्सला हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा असे आवाहन केले आहे.
अगदी कमी वेळात या पोस्टरला मोठी पसंती मिळाली आहे. तब्बल सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. यावरून लक्षात येते की प्रेक्षक 'पुष्पा 2' करता कीती प्रमाणात उत्सुक आहेत. सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळणारा पहिला भारतीय चित्रपट पोस्टर असे म्हणून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेकर्सनं ती पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, आयकॉन अल्लूची झलक तुम्हाला वेडं केल्याशिवाय राहणार नाही.
'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise - Part 1) हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'पुष्पा द राइज' या चित्रपटातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'मैं झुकेगा नहीं साला', 'फ्लावर नहीं फायर है' या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सनं तर प्रेक्षकांना वेड लावलं. 'पुष्पा' चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
'पुष्पा' सिनेमाप्रमाणे 'पुष्पा 2'मध्येही अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika mandanna) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा द रुल' या सिनेमात साई पल्लवीची (Sai Pallavi) एन्ट्री होऊ शकते असे म्हटले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या