एक्स्प्लोर
रितेशच्या फोटोवर सिद्धार्थ जाधवची कमेंट, जेनेलियाच्या उत्तराने सिद्धार्थने हात जोडले
तुम्ही रिअल लाईफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात असं ट्वीट जेनेलिया देशमुखने केलं आहे. आता प्रश्न असा आहे की असं ट्वीट करण्यामागे नेमकं काय घडलं? त्यासाठी आपल्याला पण थोडा रिव्हर्स गिअर टाकावा लागेल.
मुंबई : 'फास्टर फेणे' सिनेमातला रिव्हर्स किंग आठवतोय? हा त्योच अंबादास.. द रिव्हर्स किंग. सिद्धार्थ जाधवने हा रिव्हर्स किंग सिनेमात साकारला असला तरी तो खऱ्या आयुष्यातही रिव्हर्स किंगच आहे बरं का. असं आम्ही नाही जेनिलिया वहिनी अर्थात जेनेलिया डिसुजा म्हणत आहे. तिचं ट्वीट पाहिल्यावर तुम्हाला अंदाज येईलच.
पाहिलंत? तुम्ही रिअल लाईफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात असं ट्वीट जेनेलिया देशमुखने केलं आहे. आता प्रश्न असा आहे की असं ट्वीट करण्यामागे नेमकं काय घडलं? त्यासाठी आपल्याला पण थोडा रिव्हर्स गिअर टाकावा लागेल.
तर या सगळ्याची सुरुवात झाली रितेश देशमुखने ट्वीट केलेल्या या फोटोपासून. या भारी फोटोवर लय भारी कमेंट यायला लागल्या. त्यात सिद्धार्थ जाधव तरी कसा मागे राहिल. सिद्धार्थने पण कमेंट केली. अगदी दोन शब्दात... "सर सुपर"
आता सरांना सुपर म्हटल्यावर मॅडम कशा शांत बसतील. त्यांनी सिद्धार्थला थेट मराठीत विचारलं. "सर सुपर आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही?"Best pictures are clicked when no one poses for them. ..... courtesy our In-house photographer @geneliad pic.twitter.com/ORfKDmq8O6
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 23, 2019
वहिनीसाहेब आपल्याला असं कोंडीत पकडतील याची बिचाऱ्या सिद्धार्थने अपेक्षाच केली नसावी. आता यावर उत्तर तर दिलंच पाहिजे. म्हणून मग सिद्धार्थने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.Sir super ??? आणि जिन्ही फोटो काढलाय तिच्या बद्दल काही नाही. https://t.co/yjJCtrYYcu
— Genelia Deshmukh (@geneliad) June 23, 2019
'सर सुपर वुमन आहेत जेनेलिया मॅम. आऊटस्टॅडिंग फोटो काढलाय असं लिहायचं होतं. टायपिंग मिस्टेक सुपर क्लिक", असं ट्वीट करुन सिद्धार्थने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर जेनेलियाने षटकार मारला आणि त्याला 'फास्टर फेणे'मधल्या रिव्हर्स किंगची आठवण करुन दिली. तिने ट्वीटमध्ये लिहिलं की, "तुम्ही रिअल लाईफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात, जमलंय बघा."Sir super "Woman" aahet @geneliad mam... outstanding photo kadalay.. अस लिहायचं होतं.... typing mistake????????????????......super click.... ???????????????????? https://t.co/DRpO6mrNAp
— Siddharth Jadhav ???????? (@SIDDHARTH23OCT) June 23, 2019
आता यावर सिद्धार्थने आणखी काही बोलणं शक्य नव्हतं. "वहिनीसाहेब", असं म्हणत त्याने फक्त हात जोडले.तुम्ही रियल लाईफ मध्ये पण ‘रिवर्स किंग’ आहात.... जमलय बघा!!
— Genelia Deshmukh (@geneliad) June 23, 2019
अर्थात हे सगळंच गंमतीत सुरु होतं. पण जेनेलियाने घेतलेल्या या शाळेमुळे सिद्धार्थ इथून पुढे कमेंट करताना हजारवेळा विचार करेल यात शंका नाही.वहिनी साहेब.....???????????????????????????? https://t.co/CmvbNtQ0cH
— Siddharth Jadhav ???????? (@SIDDHARTH23OCT) June 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement