Tiger 3 teaser : सलमान खान (Salman Khan ) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करून सलमाननं चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केले आहे. टीझरमधील कतरिना आणि सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
टीझरमध्ये कतरिनाचा डॅशिंग अंदाज दिसत आहे. टीझर शेअर करून सलमाननं कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. टायगर-3 हा 21 एप्रिल 2023 म्हणजेच ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ' हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती देखील सलमाननं या पोस्टमधून दिली आहे.
एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांप्रमाणेच टायगर-3 ला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या :
- Mahesh Bhatt : महेश भट यांनी सांगितला आलियाच्या बालपणीचा किस्सा; म्हणाले...
- Sonakshi Sinha ,Salman Khan : सलमान आणि सोनाक्षीचा पार पडला विवाह सोहळा? फोटो होतोय व्हायरल
- Kabhi Eid Kabhi Diwali : ना ईद ना दिवाळी, सलमान खानचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha