OTT Stars : मनोरंजन क्षेत्रात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना काळात ओटीटी माध्यमामने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांची आणि वेबसीरिजची प्रेक्षक प्रतीक्षा करत असतात. ओटीटीमुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली आहे. तसेच हे कलाकार लोकप्रिय झाले आहेत. या कलाकारांच्या यादीत बॉबी देओल, पंकज त्रिपाठीसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
बॉबी देओल
बॉबी देओलने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण त्यांना खरी ओळख 'आश्रम' या वेबसीरिजने मिळाली आहे. बॉबी देओलच्या निराला रूपाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या वेबसीरिजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षक आता चौथ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत.
जितेंद्र कुमार
जितेंद्र कुमारने सिनेमाच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. पण वेबसीरिजमुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला. जितेंद्र कुमारने त्याच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले. जितेंद्रची कोटा फॅक्ट्री आणि पंचायत ही वेबसीरिज चांगलीच गाजली. नुकताच प्रदर्शित झालेला पंचायतचा दुसरा सीझन आणि त्यातील जितेंद्र कुमारच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
पंकज त्रिपाठी
वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत पंकज त्रिपाठीचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. पंकज अनेक सिनेमांत झळकला असला तरी मिर्जापूरमधील कालीन भैया या पात्राने त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. लवकरच या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
अली फजल
अली फजल हे मनोरंजनक्षेत्रातील नामांकित नाव आहे. ‘थ्री इडियट्स’ सारख्या अनेक सिनेमांत अली फजल दिसून आला आहे. पण मिर्जापूर या वेबसीरिजमुळे अली फजलला लोकप्रियता मिळाली. या वेबसीरिजमध्ये अली फजलने गुड्डू भैयाचे पात्र साकारले होते.
अभिषेक बनर्जी
'स्त्री' आणि 'ड्रीमगर्ल' या सिनेमांत अभिषेक बनर्जीने काम केलं आहे. पण पाताल लोक या वेबसीरिजमुळे अभिषेक बनर्जी लोकप्रिय झाला. तो VF पिक्चर्स, टाइपराइटर, कालीसारख्या अनेक सिनेमांत आणि वेबसीरिजमध्ये दिसून आला आहे.
संबंधित बातम्या