Abhay Deol : बॉलिवूड अभिनेता अभय देओल (Abhay Deol) याने आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अभिनेता अभय देओलला नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलायला आवडते. बेधडक बोलीसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने नुकतीच बॉलिवूड जगताची पोलखोल केली आहे. अलीकडेच एका मीडिया संवादात अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित काही मोठी रहस्य उघड केली आहेत. यादरम्यान, त्याने चित्रपटांशी संबंधित अनेक उपक्रमांबद्दल सांगितले.


अभय देओलने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नकारात्मक मार्केटिंगविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, 'चित्रपटाबद्दल बझ निर्माण करण्यासाठी, लोकांना त्यांच्याबद्दल नकारात्मक गोष्टी लिहिण्यास प्रभावित करतात. याशिवाय, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्टार्सच्या सेटवरील नात्यांबद्दल काही कथा गुंफल्या जातात आणि नंतर लोक या खोट्या कथांकडे लक्ष देऊ लागतात.’


या गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात!


अभय देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘आमच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बहुतेक गोष्टी आम्हाला आधीच सांगितल्या जातात. कारण काही लोकांना आम्ही त्याबद्दल बोलावे असे वाटते. लोकांच्या गर्दीला आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्याचा सार्वजनिकपणे बाजार मांडला जातो.’


अभयने त्याच्या चाहत्यांना अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे. अभय म्हणाला 'आपण जे काही ऐकतो आणि वाचतो, ते आपल्याला बोलायला भाग पाडते. लोकांना सेलिब्रिटींकडे आकर्षित करण्यासाठी या गोष्टी डिझाइन केल्या जातात, या प्रतिमा तयार केल्या जातात. म्हणूनच सेलिब्रिटींच्या बातम्या वाचताना आपण जागरूक असले पाहिजे. कारण, प्रत्येकवेळी तुम्ही जे काही ऐकता ते खरे नसते.’ सध्या अभय देओल त्याच्या ‘जंगल क्राय’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.


‘जंगल क्राय’मधून प्रेक्षकांच्या भेटीला


अभय देओलने 2005 साली 'सोचा ना था' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो ‘देव डी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांमध्ये झळकला. त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अनेक चित्रपट केले आहेत. नुकताच त्याचा 'जंगल क्राय' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अभिनेता फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे.


हेही वाचा :


Shahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती'... राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट


IIFA Awards 2022 : 'आयफा' पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार; कलर्सवर होणार प्रक्षेपण