Free Movies : कोरोनानंतर सिनेमागृहात जाऊन सिनेमा (Movies) पाहण्यापेक्षा अनेक प्रेक्षक घरबसल्याच त्या सिनेमाचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षकांची पाऊले पुन्हा सिनेमागृहाकडे वळलेली नाहीत. घरबसल्या एक चांगला सिनेमा (Movies) किंवा वेबसीरिज (Web Series) पाहण्यावर प्रेक्षक भर देत आहेत. प्राईम व्हिडीओ (Prime Video), झी 5 (Zee 5), हॉटस्टार (Hotstar), नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सिनेमा, वेबसीरिज पाहताना दिसून येत आहेत. तसेच अनेक चांगले सिनेमे प्रेक्षक मोफतदेखील पाहू शकतात. 


मोफत पाहा 'हे' सिनेमे (Free Movies)


भेडिया (Bhediya)
कुठे पाहाल? जिओ सिनेमा (Jio Cinema)


अमर कौशिकने 'भेडिया' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून दिनेश विजानने निर्मिती केली आहे. 'भेडिया' एक हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात वरुण धवन आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा प्रेक्षक जिओ सिनेमावर मोफत पाहू शकतात. 


विक्रम वेधा (Vikram Vedha)
कुठे पाहाल? जिओ सिनेमा


'विक्रम वेधा' हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळेल. हृतिक रोशन (Hrithik Roshan), सैफ अली खान (Saif Ali Khan), राधिका आपटे (Radhika Apte), रोहित सराफ आणि शारिब हाशमी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पुष्कर-गायत्रीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा सिनेमा मोफत पाहता येईल.


लुका छुपी (Luka Chuppi)


'लुका छुपी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दिनेश विजयने सांभाळली आहे. कार्तिक आर्यन आणि कृती सेनन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हा रोमँटिक सिनेमा प्रेक्षकांना जिओ सिनेमावर पाहता येईल.


गोलियों की रासलीला रामलीला (Ram-Leela)


'गोलियों की रासलीला रामलीला' हा नाट्यमय सिनेमा आहे. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ऋचा चड्ढा, सुप्रिया पाठक, शरद केळकर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.


मेड इन चायना (Made in China)


'मेड इन चायना' हा सिनेमा 2019 मध्ये रिलीज झाला आहे. या विनोदी सिनेमाचं दिग्दर्शन मिखिल मुसानेकेलं आहे. या सिनेमात राजकुमार राव, मौनी रॉय आणि बोमन ईरानी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. परिंदा जोशी या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. जिओ सिनेमावर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 


अंजाना अंजानी (Anjaana Anjaani)


'अंजाना अंजानी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने सांभाळली आहे. या सिनेमात रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि जायद खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आकाश आणि कियाराची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.


कॉकटेल (Cocktail)


'कॉकटेल' हा सिनेमा 2012 मध्ये रिलीज झाला आहे. हा रोमँटिक, नाट्यमय सिनेमा आहे. होमी अदजानियाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कॉकटेल या सिनेमात सैफ अली खान, दीपिका पादुकोण, डायन पेंटी, डिंपल कपाडिया, बोमन ईरानी आणि रणदीप हुड्डा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


CAA अध्यादेशावरून बॉलिवूडमध्ये रणकंदन! कोणी समर्थनात तर कोणी विरोधात