Sherika De Armas Died: माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरिका डी अरमासचे (Sherika De Armas) निधन झाले. तिने 2015 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे (Uruguay) प्रतिनिधित्व केले होते. एका रिपोर्टनुसार, शेरिका डी अरमास ही गेल्या काही दिवसांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. शेरिकानं केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार देखील घेतले होते. पण  13 ऑक्टोबर रोजी वयाच्या 26 व्या वर्षी  शेरिकानं अखेरचा श्वास घेतला आहे.

  


शेरिका डी अरमासच्या निधनानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शेरिकाच्या निधनानं उरुग्वे आणि जगभरात शोककळा पसरली आहे.  शेरिकाच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. मिस युनिव्हर्स उरुग्वे 2022 कार्ला रोमेरोनं  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लिहिलं,  "मी आजपर्यंत भेटलेल्या सर्वात सुंदर महिलांपैकी ती एक होती." मिस उरुग्वे 2021 लोला डे लॉस सॅंटोसने देखील शेरिका डी अरमासच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. "तू नेहमी माझ्या आठवणीत राहशील. केवळ  तू मला दिलेल्या पाठिंब्यामुळेच नाही  तर तुझ्या स्नेहामुळे, तुझा आनंदामुळे, आपल्यात असणाऱ्या  मैत्रीमुळे तू माझ्या आठवणीत राहशील. ", असं म्हणत लोला डे लॉस सॅंटोसने  शोक व्यक्त केला आहे.


 " माझी लहान बहीण नेहमीच उंच उड्डाण करा"; अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन शेरिका डी अरमासचा भाऊ मयक डी अरमासनं शोक व्यक्त केला.






जाणून घ्या शेरिका डी अरमासबद्दल


2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत शेरिका डी अरमास ही पहिल्या 30 मध्ये देखील नव्हती. पण ती या स्पर्धेत सहभागी झालेल्या  18 वय असणाऱ्या  सहा मुलींपैकी एक होती. शेरिकाने स्वतःची मेक-अप लाइन देखील लाँच केली होती. तिच्या शे डी अरमास स्टुडिओ या कंपनीमध्ये हेअर आणि  पर्सनल केअर प्रोडक्ट्स विकले जातात. शेरिका हा तिचा वेळ पेरेझ स्क्रॅमिनी फाऊंडेशनमध्ये देखील घालवत होती. ही संस्था कर्करोगाने पीडित मुलांवर उपचार करते. आता शेरिकाच्या निधनानंतर फॅशन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Bhairavi Vaidya: ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास