Aditi Arya And Jay Kotak: माजी मिस इंडिया आदिती आर्या (Aditi Arya) ही लग्नबंधनात अडकली आहे. आदिती आर्यानं जय कोटकसोबत (Jay Kotak) लग्नगाठ बांधली आहे. आदिती आणि जय यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  मुंबईतील (Mumbai) जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio Convention Centre) आदिती आणि जय यांचा विवाह सोहळा पार पडला. जाणून घेऊयात आदितीचा पती जय कोटक याच्याबद्दल...


आदितीचा पती  जय कोटक हा बँकिंग टायकून उदय कोटक (Uday Kotak) यांचा मुलगा आहे. सध्या तो  कोटक 811 चा सह-हेड आहे. McKinsey आणि Goldman Sachs सह, जय 2019 मध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात सामील झाला.  नंतर, स्ट्रॅटर्जी आणि उत्पादन विकासावर देखरेख करत 2021 मध्ये कोटक 811 संघाचे नेतृत्व जयने केले. जय हा  हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पदवीधर झाला. त्यानंतर त्याने कोलंबिया विद्यापीठातून इतिहासात बी.ए. केले आहे.


जाणून घ्या आदितीबद्दल...


गुरुग्रामची राहणारी अदिती ही 2015 मध्ये फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली होती. तसेच तिने चीनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड 2015 या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आदितीने 2021 मध्ये ‘83’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.






जय कोटक आणि आदिती आर्या यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामधील आदितीच्या ब्रायडल लूकनं अनेकांचे लक्ष वेधले, रेड कलरचा लेहंगा आणि गोल्डन अँड ग्रीन कलरचे दागिने असा खास लूक आदितीनं विवाह सोहळ्यासाठी केला होता. आदितीनं तिच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझी व्यक्ती सापडली." आदितीनं शेअर केलेल्या विवाह सोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. काहींनी फोटोला कमेंट करुन अनेकांनी जय आणि आदिती यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






 


इतर महत्वाच्या बातम्या:


Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो; म्हणाले...