एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

Oscars Awards 2023 : 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले असते. 2022 चा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. 2022 मध्ये कोडा सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. आता 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर झाली आहे. 13 मार्च 2023 रोजी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 

'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने 2.5 कोटींची कमाई केली आहे.

ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक

 शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांकडून  केतकी चितळेला अटक करण्यात आली  आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

'द आर्चीज'चं पोस्टर प्रदर्शित

आजकाल अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान , बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.  

'वाय' नक्की आहे तरी काय ? मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत

 'वाय' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सत्य घटनांवर आधारित सिनेमा असणार आहे. कल्पनेपलिकडील वास्तवाची 'ती' च्या लढ्याची गोष्ट 'वाय' सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजित वाडीतरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुसा सांभाळली आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे. 

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू

मल्याळम अभिनेत्री आणि मॉडेल सहानाने शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला आहे. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच सहानाच्या पत्नीनेच तिची हत्या केल्याचा आरोप सहानाच्या कुटुंबियांनी केला आहे. 

'छत्रपती संभाजी महाराज' ग्रंथावर आधारित 'छावा-द ग्रेट वॉरिअर' सिनेमा लवकरच प्रदर्शित

‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या सिनेमाची घोषणा झाली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित हा सिनेमा आहे. राहुल जाधव यांनी ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

अभिमन्यू दासानीच्या 'निकम्मा'चे मोशन पोस्टर रिलीज

अभिनेता अभिमन्यू दासानीने त्याच्या आगामी 'निकम्मा' सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या सिनेमात अभिमन्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, विनोद, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे.

सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावर्षी 'भाईजान'चा नवा चित्रपट न आल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. सलमान खानने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.  

अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षय कुमाक कान्स चित्रपट महोत्सावात हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
KBC 18: खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
Pune Crime:शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Embed widget