Satya Prem Ki Katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणीचा (Kiara Advani) 'सत्य प्रेम की कथा' (Satya Prem Ki Katha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक-कियाराची जोडी याआधी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमात दिसून आली होती. या सिनेमात दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमाची उत्सुकता आहे.
'सत्य प्रेम की कथा'चा फर्स्ट लुक आऊट
कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमातील फर्स्ट लुक आऊट झाला आहे. फर्स्ट लुकमध्ये कार्तिक आणि कियाराचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. 'सत्य प्रेम की कथा' या सिनेमात प्रेक्षकांना म्यूजिकल लव स्टोरी पाहायला मिळणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
'सत्य प्रेम की कथा' या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर विद्वान सांभाळणार आहेत. तर साजिद नाडियाडवाला आणि नम: पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाचे नाव आधी 'सत्यनारायण की कथा' असे ठेवण्यात आले होते. पण आता निर्मात्यांनी या सिनेमाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्तिक-कियाराचे आगामी सिनेमे
'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले होते. या सिनेमानंतर कार्तिकचा 'फ्रेडी', 'शहजादा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर कियाराचा 'जुग जुग जियो' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला आहे. या सिनेमा व्यतिरिक्त कियाराचा 'गोविंदा नाम तेरा' आणि 'RC15' हा तेलुगू सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या