Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan)  'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कार्तिकचा हा चित्रपट  20 मे रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफऑर्मवर प्रदर्शित झाला. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भूल भुलैय्या-2 हा चित्रपट रिलीज झाला.  भूल भुलैय्या-2  चित्रपटाच्या नावाचा सामावेश आता नेटफ्लिक्सच्या टॉप चित्रपटांच्या यादीत झाला आहे.  भूल भुलैय्या-2  हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर आता कार्तिक आर्यननं प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


कार्तिक आर्यननं एका मुलाखतीमध्ये ओटीटीवर मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं, 'माझ्या चाहत्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून होत असलेले कौतुक पाहणे खूप आनंददायी आहे.' पुढे कार्तिक म्हणाला, 'नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यापासून आमचा चित्रपट जागतिक स्तरावर आणि 19 देशांत प्रथम क्रमांकाचा नॉन इंग्लिश चित्रपट म्हणून ट्रेंड करत आहे. जगभरातील प्रेक्षकांची पसंती या चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून भाषेचे बंधन तोडलं जात आहे.'


'सोनू के टीटू की स्वीटी', 'प्यार का पंचनामा 2', 'भूल भुलैया 2', 'पति पत्नी और वो' आणि 'धमाका' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे काही आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'सत्यनारायण की कथा' आणि 'कॅप्टन इंडिया' हे कार्तिकचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या कथानकाला आणि प्रेक्षकांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा: