एक्स्प्लोर
फरहानच्या ‘लखनऊ सेंट्रल’चा फर्स्ट लूक रिलीज
अभिनेता फरहान अख्तर यांनी आपल्या आगामी ‘लखनऊ सेंट्रल’ सिनेमाची पहिला लूक रिलीज केला आहे. सोशल मीडियावरुन सिनेमातील लूक असलेला पहिला फोटो शेअर केला आहे.
मुंबई : अभिनेता फरहान अख्तर याने आपल्या आगामी ‘लखनऊ सेंट्रल’ सिनेमाचा पहिला लूक रिलीज केला आहे. सोशल मीडियावरुन सिनेमातील लूक असलेला पहिला फोटो शेअर केला आहे.
“ये है किशन मोहन गिरहोत्रा... जेल में इसे 1821 बुलाते हैं”, असं कॅप्शन देत फरहानने हा फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.
https://twitter.com/FarOutAkhtar/status/889352546346688512
‘लखनऊ सेंट्रल’च्या या फोटोत फरहान कैद्याची पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर लिहिलं आहे, “नाम- किशन मोहन गिरहोत्रा, कैदी नं. -1821 दिनांक-24.7.2017.”
रंजीत तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. 15 सप्टेंबर 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement