एक्स्प्लोर
‘फन्ने खान’मधील अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज
अनिल कपूर यांचं सध्या वय 60 वर्षे आहे. मात्र, फर्स्ट लूक पाहता, ते साठीत पोहोचल्याचेही दिसून येत नाही.
![‘फन्ने खान’मधील अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज First Look Of Anil Kapoor In Fanney Khan Released Latest Updates ‘फन्ने खान’मधील अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/10223918/Anil-Kapoor-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेते अनिल कपूर यांच्या आगामी ‘फन्ने खान’ सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात अनिल कपूर यांची नक्की काय भूमिका असेल, हे अद्याप कळलं नसलं, तरी या सिनेमातील अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
https://twitter.com/AnilKapoor/status/906800003355516928
अभिनेते अनिल कपूर यांनी सोशल मीडियावरुन ‘फन्ने खान’ सिनेमातील फर्स्ट लूकचे फोटो शेअर केले.
अनिल कपूर यांचं सध्या वय 60 वर्षे आहे. मात्र, फर्स्ट लूक पाहता, ते साठीत पोहोचल्याचेही दिसून येत नाही.
https://twitter.com/AnilKapoor/status/906857609054916608
‘फन्ने खान’ सिनेमाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकर यांनी केले आहे.
एका फोटोच्या कॅप्शनमध्ये अनिल कपूर यांनी म्हटलंय, “फन्ने कानचे अनेक चेहरे आहेत. शिवाय जगभरातील अनेक रहस्य तो आपल्या चांदीसारख्या केसांमध्ये लपवत आहे.”
https://twitter.com/PuneTimesOnline/status/906749362042232832
‘फन्ने खान’ हा विनोदी सिनेमा असल्याची चर्चा असून, यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांचीही मुख्य भूमिका आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा, कृराज एंटरटेन्मेंट आणि टी-सीरीज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
2018 मधील एप्रिल महिन्यात 13 तारखेला अनिल कपूर यांची हटके भूमिका असलेला ‘फन्ने खान’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)