Filmfare Awards 2024 : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांमध्ये 'फिल्मफेअर पुरस्कारां'ची (Filmfare Awards) चांगलीच क्रेझ असते. आता यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांना बॉलिवूडकरांना उत्सुकता आहे. 'फिल्मफेअर अवॉर्ड 2024' हा पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमध्ये होणार आहे.


'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' हा हिंदी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस आणि जुना पुरस्कार सोहळा आहे. आता 69 व्या पुरस्कार सोहळ्यासाठी केड कार्पेट सज्ज आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचा त्यांच्या कामासाठी गौरव होणार आहे.


'फिल्मफेअर अवॉर्ड्सची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटी आपल्या जबरदस्त सादरीकरणाने रेड कार्पेटवर आग लावतात. आता 69 व्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


फिल्मफेअर अवॉर्ड्स कधी आणि कुठे होणार? 


28 जानेवारी 2024 रोजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' हा पुरस्कार सोहळा होणार आहे.'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये प्रेक्षकांना मजा, मस्तीसह कलाकारांचं धमाकेदार नृत्य सादरीकरण आणि अभिनेत्रींच्या हॉट अदा पाहायला मिळणार आहेत. 


आलिया भट्टला 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023'मध्ये 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी तिचा गौरव करण्यात आला आहे. तर राजकुमार रावलादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.


जुलै 2023 मध्ये गुजरात पर्यटन निगम लिमिटेडने (टीसीजीएल) 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या आयोजन करण्याचं ठरवलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलदेखील उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासह बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफदेखील हिंदी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व करताना दिसून येईल. 


टायगर श्रॉफ आणि फिल्मफेअरचं खास नातं


टायगर आणि गुजरातचं एक खास नातं आहे. याबद्दल बोलताना टायगर म्हणाला,"गुजरात आणि माझं खास नातं आहे. माझे आजोबा हे गुजरातचे आहेत. तसेच फिल्मफेअर हा पुरस्कार सोहळादेखील माझ्यासाठी खूप खास आहे. 1990 रोजी मी पहिल्यांदा या पुरस्कार सोहळ्यासोबत जोडलो गेलो. हा एक अद्भुत अनुभव आहे". 


फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबद्दल जाणून घ्या...


फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 1954 रोजी झाली आहे. ब्लॅकने (2005) एका वर्षात सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केले होते. यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे 11 पुरस्कार 'ब्लॅक'ला मिळाले होते. सिने कलाकारांचा आणि त्यांच्या कलाकृतींचा गौरव करणारा 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा' आहे. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा अभिमानाचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'