Vicky Kaushal Katrina Kaif Wedding : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लग्नासाठी राजस्थानला रवाना झाले आहेत. जोधपूरला जात असताना दोघेही विमानतळावर दिसून आले आहेत. विमानतळावर दोघांनी फोटोसाठी छान पोझदेखील दिल्या आहेत. फोटोत दोघेही आनंदात दिसत आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे. लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कतरिना आणि विकी यांचा तीन दिवस चालणारा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये होणार आहे. राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे.
7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 10 डिसेंबरला रिसेप्शनने या उत्सवाची सांगता होणार आहे. विकी आणि कतरिनाने शाही विवाहसोहळ्याआधी कोर्ट मॅरेज केले असल्याचे म्हटले जात आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.
संबंधित बातम्या
Katrina Kaif : लग्नाआधी नववधू कतरिना कैफ कुटुंबासह पोहोचली विकी कौशलच्या घरी
World Record : T-Series चा विक्रम! 20 कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स असणारे भारताचे पहिले YouTube चॅनल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha