Legends of Ramayana : राम नवमीच्या निमित्ताने 'लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष' (Legends of Ramayana) ही मालिका डिस्कव्हरी+ वर प्रदर्शित होणार आहे. येत्या 7 एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतातील लोकप्रिय लेखक अमिष त्रिपाठी (Amish Tripathi) ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. 


'लीजंडस ऑफ द रामायणा' या मालिकेचे शूटिंग श्रीलंका, अयोध्या, नाशिक आणि हंपीमध्ये झाले आहे. या मालिकेत  महाकाव्या संबंधित अनेक गूढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खिळवून ठेवणाऱ्या दृश्यांची रेलचेल असणाऱ्या या मालिकेची वाईड अँगल फिल्म्सने प्रस्तुती केली आहे.





श्रीरामांना एक मोठी बहीण होती? कैकेयीने श्रीरामांना 14 वर्षांच्याच वनवासासाठी का पाठवले? नाशिक शहराला ते नाव कसे मिळाले? श्रीराम आणि गौतम बुद्ध यांना जोडणारा समान धागा कोणता आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मालिकेत प्रेक्षकांना मिळणार आहेत. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : आरआरआर चित्रपट पाहिल्यानंतर एस.एस राजामौली यांची फॅन झाली कंगना; म्हणाली...


Dasvi : अभिषेक बच्चनच्या 'दसवीं' सिनेमातील 'ठान लिया' गाणं रिलीज


RRR Box Office Collection Day 7:पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाहा किती गल्ला जमवला?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha