Fighter OTT Release : 'मल्टिस्टारर' 'फायटर' (Fighter Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मागील महिनाभरापासून फायटरने बॉक्सने सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने देशातच 211 कोटींचे उत्पन्न मिळवले. तर, वर्ल्डवाईड कमाईचा आकडा 336 कोटी रुपये इतका आहे. मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता 'फायटर' चित्रपट ओटीटीवर रिलीज (Fighter OTT Release) होणार आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाची कथा ही हवाई दलाच्या धाडसी मोहिमेवर आधारीत आहे. या चित्रपटाचा निर्मिती खर्च 250 कोटींच्या घरात होता. या चित्रपटाने एकूण 336 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क आणि ओटीटीचे हक्कांची मोठी डील करण्यात आली आहे.
किती रुपयांना झाली डील?
फायटर चित्रपटाचे ओटीटी प्रसारण हक्क हे नेटफ्लिक्सने विकत घेतले असल्याचे वृत्त आहे. ही डील 150 कोटींना झाल्याची माहिती आहे.
फायटर ओटीटीवर कधी होणार रिलीज?
2019 मध्ये पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित हा चित्रपट होळीच्या निमित्ताने मार्च महिन्यात OTT वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु 21 मार्च 2024 पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल अशी चर्चा आहे.
'या' देशांमध्ये 'फायटर'वर बंदी
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाला अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमध्ये फायटरवर बंदी घालण्यात आली आहे. 'फायटर' या सिनेमात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हवाई हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे.