एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फरहानकडून हृतिकची पाठराखण, कंगनाला फटकारलं
सात वर्षांचं प्रेम प्रकरण असल्याचा दावा तिने केला. त्याने तिचे आरोप फेटाळून लावले, इतकंच नाही तर स्वतःचा लॅपटॉप, ईमेल आयडीही तपासासाठी दिला, मग तिने सहकार्य का नाही केलं?' असा सवालही फरहानने उपस्थित केला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि क्वीन अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादात आता अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने उडी घेतली आहे. हृतिकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत फरहानने त्याची पाठराखण केली आहे, तर कंगनाला 'लक्ष्य' केलं आहे.
फेसबुकवर लिहिलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये हृतिक-कंगनाचं नाव न घेता फरहानने निशाणा साधला आहे.
'कोण बरोबर कोण चूक, हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. सायबर क्षेत्रातील जाणकार हे प्रकरण तडीस नेतलीच. पण तो पुरुष आणि ती स्त्री या दोघांना मी व्यावसायिकदृष्ट्या चांगलंच ओळखतो.' असं फरहानने पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे.
अखेर हृतिकने मौन सोडलं, कंगनाच्या आरोपांवर फेसबुक पोस्ट
'आपल्या समाजात अनेकदा महिलांना अत्याचाराचा सामना करावा लागतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही वेळा पीडितेलाच यासाठी जबाबदार ठरवलं जातं. बहुतांश वेळा महिलाच अन्यायाला बळी पडतात, मात्र प्रत्येक आणि बहुतांश या शब्दांमध्ये फरक आहे' हे फरहानने अधोरेखित केलं आहे. हृतिकने मला दुसरं मरणं दिलं, त्याने माफी मागावी : कंगना 'फार कमी प्रकरणांमध्ये का असेना, पुरुषांवर पाळत ठेवली जाते, छळ केला जातो आणि खोटे आरोप केले जातात. काही जणांनी दुसरी बाजू ऐकून न घेताच महिलेची बाजू उचलून धरली. सात वर्षांचं प्रेम प्रकरण असल्याचा दावा तिने केला. त्याने तिचे आरोप फेटाळून लावले, इतकंच नाही तर स्वतःचा लॅपटॉप, ईमेल आयडीही तपासासाठी दिला, मग तिने सहकार्य का नाही केलं?' असा सवालही फरहानने उपस्थित केला आहे. कंगनाच्या आरोपांनंतर सुझानचं हृतिकच्या समर्थनार्थ ट्वीट 'तिच्याकडे दोघांच्या सात वर्षांच्या रिलेशनशीपचा एकही पुरावा नाही. साधा फोटोही नाही. पॅरिसमध्ये साखरपुडा झाल्याचा दावा ती करते, पण त्या काळात तो फ्रान्सला गेल्याचा स्टॅम्प पासपोर्टवर का नाही? महिलेची बाजू डोळेझाकपणे स्वीकारली जाते' असं फरहानने म्हटलं आहे. सत्य काहीही असो स्त्री-पुरुष यांची बाजू घेताना भेदाभेद नको, असं फरहानने म्हटलं आहे. फरहानची फेसबुक पोस्ट : 'आप की अदालत'मध्ये कंगनाने हृतिकवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर रोशन पिता-पुत्रांनी मौन बाळगलं, मात्र हृतिकने अखेर आपली बाजू मांडून 'माझं मौन म्हणजे माझी दुर्बलता नाही' असं प्रत्युत्तर दिलं होतं. कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्रीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement