मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट आणि वेब शोमध्ये कलाकारांच्या कास्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कास्टिंग डायरेक्टर सेहर अली लतीफ (Seher Latif) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंआहे. काही दिवसांपूर्वी सेहर लतीफ यांना किडनीच्या आजाराचं निदान झाल्यामुळे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली आणि अखेर त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 


चित्रपट 'मस्का' मध्ये मुख्य भूमिका साकरणारा अभिनेता प्रीत कमानी (Prit Kamani) ने एबीपी न्यूजशी सेहर लतीफ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देत दुःख व्यक्त केला. तसेच त्या माणूस म्हणूनही खूप चांगल्या होत्या असं सांगितलं. 


'भाग बिनी भाग' नावाच्या वेब शोच्या कास्टिंग डायरेक्टर म्हणून पाहत होत्या काम


सेहर लतीफ 'लंच बॉक्स', 'मॉनसून शूटआउट', 'शंकुतला देवी', 'दुर्गामति', 'मस्का' यांसारख्या चित्रपटांव्यतिरिक्त 'भाग बिनी भाग' नावाच्या वेब शोचंही कास्टिंग करत होत्या. त्यांनी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला चित्रपट 'मस्का' आणि वेब शो 'भाग बिनी भाग'ला आपलं प्रोडक्शन हाऊस 'म्यूटंट फिल्म्स' अंतर्गत प्रोड्यूसही केलं होतं. 


सेहर लतीफला आंतरराष्ट्रीय स्तरांवरील चित्रपट आणि वेब शोच्या कास्टिंगसाठीही ओळखलं जात होतं. ज्यामध्ये 'ईट लव प्रे', 'फ्यूरियस 7', 'टाइगर्स', 'वॉइसरॉयज हाऊस', 'मॅकमाफिया', 'सेंस 8' यांचा समावेश आहे. 


अभिनेत्री निकिता दत्ताकडून‌ सेहर लतीफ यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त 


सेहर लतीफ यांचं नाव  'गोल्ड', 'शकुंतला देवी' आणि 'नोबेलमॅन' यांसारख्या चित्रपटांमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही जोडलं गेलं होतं. त्यांना 'जीरो डार्क थर्टी', 'द गुड करमा हॉस्पिटल', 'बेस्ट एक्जॉटिक मेरीगोल्ड हॉटेल', 'द मॅन हू न्यू इंफिनिटी', 'मिलियन डॉलर आर्म', 'लाइन ऑफ डिसेन्ट' यांसारख्या विदेशी चित्रपटांमध्ये सेहर लतीफ यांना भारतीय कलाकारांची कास्टिंग करण्यासाठी श्रेयं दिलं जातं. 


चित्रपट 'लंचबॉक्स'ची अभिनेत्री निमरत कौर आणि फिल्म 'मस्का' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी निकिता दत्ता यांनी सोशल मीडियावर पोस्टमार्फत सेहर लतीफच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं. बॉलिवूडशी जोडलेल्या इतरही काही सेलिब्रिटींनी सेहर लतीफ यांच्या जाण्याबाबत दुःख व्यक्त केलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :