अहमदनगर :  सोनी टीव्हीच्या (Sony TV)इंडियन आयडल (Indian Idol) या रियालिटी शोचे नुकतेच एलिमिनेशन झाले. या एलिमिनेशनमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील गायिका अंजली गायकवाड (Singer anjali gaikwad) स्पर्धेतून बाहेर झाली. अंजली स्पर्धेतून बाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इतकेच नाही तर तिला पुन्हा इंडियन आयडल या शोमध्ये घ्यावे अशी मागणी तिचे चाहते करत आहेत. एवढेच नाही तर काँग्रेस नेते अजय माकन (Ajay Maken) यांनीही ट्विट करत अंजलीला शोमध्ये परत घेण्याची मागणी केली आहे. 


अंजलीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण तिच्या वडिलांकडून म्हणजे अंगद गायकवाड यांच्याकडून घेतले. अंजलीने 2017 मध्ये पार पडलेल्या सारेगामापा लिटिल चॅम्प्स (Saregamapa Littele champ) या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. आणि त्यानंतर ती इंडियन आयडल या स्पर्धेत सहभागी झाली. इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतील अंजली ही सर्वात कमी वयाची स्पर्धक होती. शास्त्रीय संगीतात प्रवीण असल्याने अंजलीच्या चाहत्यांचा वर्ग देखील मोठा झाला. मात्र इंडियन आयडलमध्ये झालेल्या एलिमिनेशनमध्ये अंजली स्पर्धेतून बाहेर झाली. 


यामुळे अंजली सोबतच तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. अंजली गायनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असल्यामुळे इंडियन आयडल फायनलमध्ये जावी अशी अंजलीसोबत तिच्या वडिलांची देखील इच्छा होती. मात्र अंजली स्पर्धेतून बाहेर झाल्याने अंजलीच्या वडिलांनी खंत व्यक्त केली आहे. अंजलीच्या प्रवासाबद्दल सध्या समाधानी आहे असे सांगून पुन्हा स्पर्धेत जाणार नसल्याचे सांगत नाराजी देखील व्यक्त केलीये. 
 
अंजली गायकवाड इंडियन आयडल स्पर्धेतून बाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. अंजली ही उत्कृष्ट गायिका होती त्यामुळे तिला पुन्हा स्पर्धेत घ्यावं अशी मागणी तिचे चाहते करत आहे. 


इंडियन आयडलमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यामुळे आता आपल्या शास्त्रीय संगीताबरोबरच इतर देखील गाण्याचे प्रकार शिकणार असल्याचे अंजलीने सांगितले आहे. इंडियन आयडल हा रियालिटी शो देशात प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत अहमदनगरच्या अंजली गायकवाडने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र इंडियन आयडलच्या एलिमिनेशन मध्ये अंजली बाहेर पडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.


अजय माकन यांचं ट्वीट


काँग्रेस नेते अजय माकन (Ajay Maken) यांनीही ट्विट करत अंजलीला शोमध्ये परत घेण्याची मागणी केली आहे.