प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला, दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं
मुंबईत दिवसाढवळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
Amy Aela Purse Theft : मुंबईत दिवसाढवळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री एमी एला हिची पर्स आणि सोनसाखळी चोरांनी हिसकावली. मुंबईतील कॉफी शॉप बाहेर ही चोरीची घटना घडल्याची माहिती आहे. अभिनेत्री एमी एलाची पर्स आणि सोनसाखळी चोरीला गेली आहे. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला
खारच्या ब्ल्यू टोकाई कॉफी स्टोइर स्टार बक्स येथे ही घटना घडली आहे. एमी एला रस्त्याने जात असताना मागून दुचाकीहून आलेल्या चोराने तिची बॅग हिसकावल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. एमीने दिलेल्या तक्रारीनुसार, आता खार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमी एलाने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण सोबत 'रन-वे 34' या चित्रपटात काम केलं आहे.
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं
एमी एला भारतीय-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एमी एला डान्समुळेही कायम चर्चेत असते. तिच्या लॅव्हिश लाईफस्टाईल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. एमी एला अहमदाबादमध्ये राहत असून देशभरात तिने अनेक चाहते आहेत. एमी एला अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. एमी एला विकी कौशल स्टारर धर्मा प्रोडक्शनच्या 'गोविंदा मेरा नाम' चित्रपटामध्येही झळकली आहे. अजय देवगणच्या रनवे 34 चित्रपटामध्येही तिने काम केलं आहे.
एमी एलाच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
कोण आहे एमी एला?
एमी एला (Amy Aela) एक भारतीय-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, मॉडेल, उद्योजक आहे. ती डान्स आणि लाईफस्टाईलसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. एमी एला अभिनेत्री असण्यासोबतच प्रसिद्ध Entrepreneur आहे. तिने ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंगमध्ये पदवी घेतली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :