Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : बॉलीवूडचे नवविवाहित जोडपं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Bollywood Actress Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Actor Zaheer Iqbal) अलिकडेच रुग्णालयात (Hospital Visit) गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट (Pregnancy) असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोनाक्षी आणि इक्बाल यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात पाहिल्यानंतर त्यांच्याबाबत जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 रोजी गुपचूप लग्न उरकलं. या दोघांचं झटपट उरकलेलं लग्न पाहता चाहते त्यांच्याबाबत नवनवीन अंदाज बांधत आहेत. सोनाक्षी आणि जहीर यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा रंगली आहे.


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?


सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रुग्णालयातील फोटो समोर आले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर सोनाक्षी सिन्हा लवकरच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. सोनाक्षी आणि जहीरच्या फोटोंवर नेटिझन्स कमेंट करताना दिसत आहेत. सोनाक्षी आणि जहीर यांचं झटपट लग्न झालं, यावरुन नेटकरी संशय व्यक्त करताना दिसत आहे. सोनाक्षी प्रेग्नेंट असल्यामुळेच त्यांनी लवकर लग्न उरकल्याचं काही नेटकरी म्हणत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी ट्रोलर्सला झापत सोनाक्षीची बाजू घेतली आहे. दरम्यान, या अफवांमागेचं सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.


सोनाक्षी सिन्हा देणार गूड न्यूज?


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अलीकडे चर्चेत आहे. तिच्या लग्नापासून गरोदरपणाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. सोनाक्षी आणि जहीर हे नवविवाहित जोडपे आता इंटरनेटवर तुफान चर्चेत आहे. सात वर्षे डेटिंग केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड अभिनेता जहीर इक्बालसोबत लग्न गेलं. दोघांनी 23 जून रोजी लग्न केलं. कुटुंबीय आणि अत्यंत मोजक्या मित्रमंडळीच्या समक्ष त्यांनी विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केलं. हिंदू आणि मुस्लिम विधींना डावलून या जोडप्याने विशेष नागरी विवाहाचा पर्याय निवडला. सोनाक्षी-जहीरने जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी केली. लग्नानंतर एका आठवड्याच्या आत या नवविवाहित जोडप्याने हॉस्पिटलला भेट दिल्याने सोनाक्षीच्या प्रेग्नेन्सीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.


व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?


शत्रुघ्न सिन्हा त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या झहीर जक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनंतरच सोनाक्षी सिन्हाचे वडील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना नियमित तपासणीसाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी सोनाक्षी आणि जहीर हे रुग्णालयात पोहोचले होते. या वेळीचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सोबतच सोनाक्षी सिन्हा गर्भवती असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चा खोट्या असून वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या तब्येतीमुळे सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल रुग्णालयात गेल्याचं समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सोनाक्षीसोबत भावाने संबंध तोडले, लग्नाला न जाण्याचं कारणही लव्ह सिन्हाने स्पष्ट केलं; जहीरचे वडील आहेत मूळ कारण