Manipur: मणिपूरमधील (Manipur) इंफाळ (Imphal) येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोच्या ठिकाणाजवळ आज (शनिवारी) सकाळी स्फोट झाला. या शोमध्ये अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हजेरी लावणार होती. मणिपूरची राजधानी इंफाळ येथील हट्टा कांगजेबुंग भागात ही घटना घडली आहे.  इंफाळ येथे आयोजित   फॅशन शोच्या ठिकाणापासून जवळपास 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाला, असं म्हटलं जात आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. 


इंफाळ पूर्व एसपी महाराबम प्रदीप सिंह यांनी एएनआयला माहिती दिली की, शनिवारी सकाळी 6.00 वाजता हा स्फोट झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चिनी ग्रेनेडमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज लावला जात आहे.


ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या काही अंतरावर फॅशन शोचा स्टेज बांधायचे काम सुरु होते. स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीस कमांडोच्या टीमनं त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन देखील केले. या घटनेत अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.हा स्फोट एक्सप्लोसिव डिव्हाइज किंवा ग्रेनेडमुळे झाला असावा, असाही अंदाज लावला जात आहे. या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. 


सनी लिओनी लावणार होती हजेरी 


सनी लिओनी ही या फॅशन शोमध्ये रविवारी (5 फेब्रुवारी) हजेरी लावणार होती. ती या शोमध्ये हँडलूमला प्रमोट करणार होती. या शोला Bridal Couture Festive Season Fall Winter Collection 2023 असं या शोचे नाव होते. सनी लिओनी या शोमध्ये हजेरीस लावणार होती त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेत होता.  या फॅशन शोचे अनेक तिकीटं देखील विकली गेली होती.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती