Vani Jayaram:  ज्येष्ठ गायिका वाणी जयराम (Vani Jayaram) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 25 जानेवारी रोजी पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan) जाहीर करण्यात आला. वाणी जयराम यांचे चेन्नईमधील (Chennai) त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 


वाणी जयराम यांनी काही दिवसांपूर्वी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष पूर्ण केले होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 10,000 जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी आरडी बर्मन (R. D. Burman), केवी महादेवन (K. V. Mahadevan), ओपी नैय्यर आणि मदन मोहन (Madan Mohan) यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केलं आहे. 'आधुनिक भारताच्या मीरा' अशी देखील त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी गायिका वाणी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती, असंही म्हटलं जात आहे. 


वाणी जयराम यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1945 रोजी तमिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यात झाला. बालपणापासूनच वाणी जयराम यांना संगीताची आवड होती. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर पहिल्यांदा परफॉर्म केलं. 1969 मध्ये त्यांनी जयराम यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्या मुंबईमध्ये शिफ्ट झाल्या. बोले रे पापीहारा, मेरे तो गिरिधर गोपाल ही गाणी वाणी जयराम यांनी गायली आहेत. देव दीनाघरी धवला या नाटकातील 'ऋणानुबंधाच्या ' हे प्रसिद्ध मराठी गाणे देखील वाणी जयराम यांनी गायले. 1972 मधील प्रदर्शित झालेल्या पाकीझा या चित्रपटातील मोरे साजन सौतन घर ही गजल देखील वाणी जयराम यांनी गायली. इप्तिवलेकादुरा ना स्वामी हे तेलुगू गाणे देखील त्यांनी गायले.






वाणी जयराम यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी या भाषांमधील गाणी गायली. त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिसा या राज्यांच्या राज्य पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Entertainment News Live Updates 4 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!