Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 29 Jul 2023 02:31 PM
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'पाटलीणबाई...';'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पाहिल्यानंतर हेमंत ढोमेनं क्षितीचं केलं कौतुक

Rocky Aur Rani Ki Prem Kahani:  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट  28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस  आला. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगनं (Kshitee Jog) पूनम रंधावा ही भूमिका साकारली आहे.  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर क्षिती जोगचा पती अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) यानं क्षितीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला15 वर्षे पूर्ण

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अर्थात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. 2008 साली सुरू झालेली ही मालिका वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. पण तरीही या मालिकेची क्रेझ कायम आहे. 

Kon Honar Crorepati : भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; आजचा भाग होणार संगीतमय!

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग विशेष असणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भीमराव पांचाळे  (Bhimrao Panchale) आणि प्रियंका बर्वे (Priyanka Barve) हजेरी लावणार आहेत. 

Vivek Agnihotri : "मला इंडस्ट्रीत बदल हवा आहे"; विवेक अग्निहोत्रीचं बॉलिवूडबद्दल वक्तव्य

Vivek Agnihotri On Bollywood Industry : सिने-निर्माता आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) अनेकदा सिनेमांसह वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याचं मत मांडत असतो. विके अग्निहोत्री आता म्हणाला,"ज्या गोष्टींबद्दल मला माहिती आहे. त्याच गोष्टींवर मी लिहितो. आता बॉलिवूड इंडस्ट्रीत मला बदल हवा आहे".

Vivek Agnihotri : "मला इंडस्ट्रीत बदल हवा आहे"; विवेक अग्निहोत्रीचं बॉलिवूडबद्दल वक्तव्य

Kishor Kadam: 'अजित पवारांना हतबल करत राहणं...'; किशोर कदम यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kishor Kadam: सौमित्र म्हणजेच किशोर कदम (Kishor Kadam) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी राजकारणाविषयी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

Baipan Bhaari Deva : 105 वर्षाच्या आजीनेही पाहिला 'बाईपण भारी देवा'

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली आहे. सर्व वयोगटातील महिला आवडीने हा सिनेमा पाहायला जात आहेत. आता 105 वर्षाच्या आजीनेही 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहिला आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Kedar Shinde) आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Premachi Gosht : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा प्रोमो आऊट; नेटकरी म्हणाले,"ये है मोहोब्बतें'चा रिमेक

Premachi Gosht : मालिकाविश्नात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. गेल्या काही दिवसांत टीआरपीमुळे अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' फ्लॉप की सुपरहिट? जाणून घ्या ओपनिंग डे कलेक्शन...

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) बहुचर्चित सिनेमांपैकी एक असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh) जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकली आहे. याआधी 'गली बॉय' या सिनेमात ते एकत्र झळकले होते.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' फ्लॉप की सुपरहिट? जाणून घ्या ओपनिंग डे कलेक्शन...

Happy Birthday Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई! जाणून घ्या खलनायक संजय दत्तचा नाट्यमय प्रवास...

Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्तचा (Sanjay Dutt) आज वाढदिवस आहे. संजय दत्त वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असला तरी प्रेक्षकांसाठी मात्र सुपरस्टार आहे. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. बॉलिवूडच्या 'संजू बाबा'चे वैयक्तिक आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. संजयच्या आयुष्यात अनेक चढउतार आले.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Chiranjeevi : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या 'भोला शंकर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता

Chiranjeevi Bholaa Shankar Trailer Out : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) सध्या त्याच्या आगामी 'भोला शंकर' (Bholaa Shankar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'भोला शंकर'चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Captain Miller Teaser Out: 'कॅप्टन मिलर' चा जबरदस्त टीझर रिलीज; धनुषच्या लूकवरुन नजर हटणार नाही

Captain Miller Teaser Out: साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush) आज वाढदिवस आहे. धनुषचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आज धनुषच्या चाहत्यांना एक गिफ्ट मिळालं आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर' (Captain Miller) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके लूकमध्ये दिसत आहे.

Oppenheimer : 'ओपनहाइमर'ने जगभरात केली 2000 कोटींपेक्षा अधिक कमाई! जाणून घ्या सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहाइमर' (Oppenheimer) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.

'ओपनहाइमर' हा सिनेमा भारतात हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या सात दिवसांत जगभरात या सिनेमाने 2050 कोटींची कमाई केली आहे. पण जगभरात सध्या 'बार्बी' (Barbie) या सिनेमाचा बोलबाला आहे. 'बार्बी' या सिनेमाची भारतात कमी क्रेझ असली तरी जगात मात्र चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे जगभरात या सिनेमाने 'ओपनहाइमर'ला मागे टाकत 3875 कोटींची कमाई केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.