Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Jul 2023 02:31 PM
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चा मोफत शो? कधी? कुठे? जाणून घ्या सर्वकाही...

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आजही अनेक सिनेमागृहांत या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. तिकीटं मिळत नसल्याने अनेक प्रेक्षकांचा हा सिनेमा पाहायचा राहिला आहे. पण आता अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) आणि शिवसेना प्रणित शिव चित्रपट सेनाने 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा मोफत शो आयोजित केला आहे. 



Tuja Maja Sapan : होणार दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात; 'तुजं माजं सपान'चा रंगणार विवाह विशेष भाग

Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे.  





Kangana Ranaut : कंगना रनौत पोहोचली नाशकात; त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन; पाहा व्हिडीओ

Kangana Ranaut Visited Nashik Trimbakeshwar Temple : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी कंगना धार्मिक आहे. अनेकदा ती वेगवेगवळ्या मंदिरांना भेट देत असते. आता तिने नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) या तीर्थस्थानाला भेट दिली आहे. 


Kangana Ranaut : कंगना रनौत पोहोचली नाशकात; त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन; पाहा व्हिडीओ

Marathi Celebrity : यंदा कर्तव्य आहे! स्वानंदी टिकेकर, 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख ते मुग्धा वैशंपायन; मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई...

Marathi Celebrity Wedding Update : मराठी मनोरंजनसृष्टीत अजूनही लगीनघाई पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक कलाकार आपल्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. यात छोट्या पडदा गाजवणारी स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar), 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन - प्रथमेश लघाटे (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate) आणि 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखचा (Amruta Deshmukh) समावेश आहे. 


Marathi Celebrity : यंदा कर्तव्य आहे! स्वानंदी टिकेकर, 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख ते मुग्धा वैशंपायन; मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई...

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'... मनोरंजनाचे उत्तम पॅकेज

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रेक्षकांना काय हवं हे करणला ठाऊक आहे. त्यामुळे चाहत्यांच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. करणचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा बहुचर्चित सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत.


Gadar 2 : 'गदर 2'च्या ट्रेलरचा धुमाकूळ! 24 तासांत मिळाले लाखो व्ह्यूज!

Sunny Deol Gadar 2 Movie Trailer Views : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) सध्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर म्हणजेच 26 ऑगस्टला निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 'गदर 2'चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


 


Shah Rukh Khan : शाहरुख खानने गौरीसोबत लग्न करण्यासाठी बदललेलं स्वत:चं नाव; नेमकं प्रकरण काय?

Shah Rukh Khan Changed His Name For Gauri : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर आज शाहरुखचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानदेखील (Gauri Khan) चांगलीच अॅक्टिव्ह आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गौरीसोबत संसार थाटण्यासाठी शाहरुखने चक्क त्याचं नाव बदललं होतं. 


Shah Rukh Khan : शाहरुख खानने गौरीसोबत लग्न करण्यासाठी बदललेलं स्वत:चं नाव; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gadar 2 Trailer: 'गदर-2' च्या ट्रेलरनं वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'


Sunny Deol Gadar 2 Trailer Out: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel)  यांच्या  'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटाचा ट्रेलर काल (26 जुलै) रोजी रिलीज झाला. या ट्रेलरमधील तारा सिंहच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  'गदर 2'  चित्रपटाच्या ट्रेलरमधील तारा सिंहच्या जबरदस्त अ‍ॅक्शनने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनेक नेटकऱ्यांनी  'गदर 2' या चित्रपटाच्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.


तेजश्री प्रधान नव्या मालिकेमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच  ‘अग्गंबाई सासूबाई’  या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच तेजश्रीची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेबद्दल तेजश्रीनं एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे. तेजश्रीनं तिच्या नव्या मालिकेबद्दल एक खास व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली. या व्हिडीओमध्ये तेजश्री म्हणते, "आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह", बरोबर ओळखलं, मी येतील आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून तुमच्या भेटीसाठी.मालिकेचं नाव, तारीख, वेळ ही सगळी उत्सुकता पूर्ण होणर आहे, आमच्या नव्या प्रोमोमधून. त्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह.' आता तेजश्रीच्या या नव्या मालिकेचं नाव काय असणार आहे? या मालिकेत आणखी कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार? असे प्रश्न तेजश्रीच्या चाहत्यांना पडले आहेत. 


SPY OTT Release: 'कार्तिकेय 2' फेम अभिनेता निख‍िल सिद्धार्थचा 'स्पाय' ओटीटीवर झाला रिलीज


SPY OTT Release: अभिनेता निखिल सिद्धार्थच्या (Nikhil Siddhartha)  2022 मध्ये रिलीज झालेल्या 'कार्तिकेय 2' या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पण 2023 मध्ये रिलीज झालेला त्याचा 'स्पाय' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. आता  निखिलचा  'स्पाय' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.