विद्या बालन सध्या भूलभुलैय्या 3 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कार्तिक आर्यन आणि माधूरी दिक्षीतही तिच्यासोबत आहेत. २००७ च्या भुलभूलैय्या चित्रपटात मंजूलिका म्हणून विद्याने सोडलेली छाप आजही लोकांच्या मनात आहे. अलिकडेच तिने मनोरंजनविश्वातील तिच्या खडतर प्रवासाविषयी आणि तिला मिळालेल्या नकारांवर खुलासा केलाय. एका मल्याळम चित्रपटानंतर विद्याला ही मुलगी 'पनौती' असल्याचं लेबल लावलं होतं. पण त्याच पनौती मुलीनं उसळी घेत बॉलिवूडला आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ घातली यात शंका नाही.
काय म्हणाली विद्या?
विद्याने एक मल्याळम चित्रपटाचं शुटिंग सुरु केले होते. पण ते शुटिंग मध्येच थांबवावे लागले. त्यामुळे या चित्रपटातील लोकांनी विद्याला ही मुलगी पनौती आहे. जेव्हापासून ती या चित्रपटाशी जोडली गेली आहे तेव्हापासून समस्या सुरु झाल्या आहेत. आता तर ही फिल्म बंद पडली आहे. असं त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हणलं होतं. पनौती लेबल लावल्यानं नंतर अनेकांनी मला चित्रपटात घेण्यास नकार दिला. काहींनी सिनेमांमधून मला काढूनही टाकलं असा खुलासा विद्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा
पनौती असा ठपका ठेवल्यानं विद्याला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आलं. अनेक सिनेमांमध्ये कास्ट केलं गेलं नाही. हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचं ती सांगते. दरम्यान, ती सध्या भुलभूलैय्या या चित्रपटातून मंजुलिका म्हणून प्रेक्षकांना भुरळ पाडताना दिसतेय.
'भूल भुलैया 3' सिनेमाविषयी...
2007 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या भूल भुलैया सिनेमाच्या तिसऱ्या भागामध्ये विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या दोन मंजुलिकाच्या भूमिकेत दिसत आहेत. अनीस बज्मीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात कार्तिकशिवाय तृप्ती डिमरी आणि राजपाल यादव-संजय मिश्रासारखे कलाकारही आहेत. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी चांगली कामगिरी करेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.