English Learning Tips : इंग्रजी (English) ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. इंग्रजी आत्मसात करण्यासाठी अनेक जण विविध प्रयत्न करत असतात. इंग्रजी भाषेत संवाद साधता यावा यासाठी लाखो लोक वेगवेगळे फंडे आजमावत असतात. वाचन (Reading), मुलाखती (Interview) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून इंग्रजी भाषा शिकायला मदत होते. चित्रपटांसह (Movies) काही मालिका (Series) पाहून प्रेक्षकांना इंग्रजी भाषा शिकण्यास मदत होऊ शकते. इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी मालिका (TV Series) किंवा मुलाखती बघण्याचा सल्ला दिला जातो. 'F.R.I.E.N.D.S','The Big Bang Theory', The Good Place, The Crown, The Great British Baking Show' या पाच मालिका पाहून इंग्रजी भाषा शिकण्यास (How to Learn English Quickly) मदत होऊ शकते. 


F.R.I.E.N.D.S :


'फ्रेंड्स' (F.R.I.E.N.D.S) ही एक विनोदी मालिका आहे. इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांसाठी ही मालिका खूपच उत्तम आहे. या मालिकेतला संवाद स्पष्ट आणि हळूवार आहे. तसेच कथा समजणंदेखील सोपं आहे. विनोदी असल्याने प्रेक्षकांना प्रत्येक शब्द व्यस्थित ऐकता येतो. तसेच विनोदी असल्याने संवाद दीर्घकाळ लक्षात राहतात. रोजच्या वापरात येणारे शब्द या मालिकेत जास्तीत जास्त दाखवण्यात आले आहेत. या मालिकेतील पात्र मजेशीर असून संवाद स्पष्ट आहेत. 
 
The Big Bang Theory :


'द बिग बँग थेअरी' (The Big Bang Theory) हीदेखील विनोदी मालिका आहे. या मालिकेत शास्त्रीय शब्दांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला आहे. विज्ञानात रस असलेल्यांसाठी ही मालिका फायदेशीर आहे. या मालिकेच्या माध्यमातून नवीन शब्द आणि वाक्यरचना शिकता येऊ शकतात. 


द गूड प्लेस (The Good Place) :


'द गूड प्लेस' (The Good Place) ही विनोदी मालिका 'फ्रेंड्स' किंवा 'बिग बाँग थिअरी'पेक्षा थोडी वेगळी आहे. पण इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांसाठी ही मालिका उपयुक्त आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनेक रंजक शब्द आणि संकल्पना शिकता येऊ शकतात. 


The Crown :


'द क्राऊन' (The Crown) ही मालिका ब्रिटिश संस्कृती आणि इतिहासात रस असेल्यांसाठी ही मालिका उत्तम आहे. या मालिकेच्या माध्यमातून तुमचा शब्दसंग्रह वाढायला मदत होईल. तसेच ब्रिटिश अॅक्सेंट शिकायची इच्छा असलेल्यांनी ही मालिका नक्की पाहावी.


The Great British Baking Show :


'द ग्रेट ब्रिटिश बेकिंग शो' ही मालिका अत्यंत मजेशीर आणि पाहण्यास माहितीपूर्ण आहे. तसेच बेकिंग, कुकिंगची आवड असणाऱ्यांनी ही मालिका नक्की पाहा. ब्रिटिश संस्कृतीची झलक या मालिकेतून पाहायला मिळेल. 


'या' पाच मालिकांची भाषा सोप्पी आहे. या मालिका पाहताना प्रेक्षकांचं मनोरंजन होण्यासोबत नवीन शब्द आणि वाक्यरचनादेखील शिकता येईल. 


संबंधित बातम्या


Siddharth Jadhav : "जुगाराची जाहिरात मी कधीच करणार नाही"; सिद्धार्थ जाधवने स्पष्टच सांगितलं, मराठी, हिंदीनंतर 'आपला सिद्धू' झळकणार 'या' इंग्रजी चित्रपटात