Emmy Awards 2023 : 'एमी पुरस्कार 2023' (International Emmy Awards 2023) या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कारांच्या नामांकनांची घोषणा झाली आहे. या यादीत शेफाली शाह (Shefali Shah), वीर दास (Vir Das) आणि जिम सर्भ (Jin Sarbh) या भारतीयांचाही समावेश आहे. शेफाली, वीर आणि जिम या तिघांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता एमी पुरस्कारासारख्या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं आहे.
एमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलाकारांचा बोलबाला!
'एमी पुरस्कार 2023' या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या नामांकनांची घोषणा झाली असून 20 देशांतील 56 लोकांना नामांकन जाहीर झाली आहेत. शेफाली शाहला 'दिल्ली क्राइम 2' या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीसाठी नामांकन जाहीर झालं आहे. शेफालीसोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत डेनमार्कच्या कोनी नील्सन, यूकेच्या बिली पाइपर आणि मॅक्सिकोच्या कार्ला सूजा आहे.
जिम सर्भला 'रॉकेट बॉइज 2' या सीरिजमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे. जिम सर्भसोबत या शर्यतीत जिम अर्जेंटीनाचा गुस्तावो बासानी, यूकेचा मार्टिन फ्रीमॅन आणि जोनास कार्लसन या अभिनेत्यांचा समावेश आहे.
अभिनेता आणि विनोदवीर वीर दासला नेटफ्लिक्सवरील 'वीर दास : लैंडिंग' या विनोदी कार्यक्रमासाठी नामांकन जाहीर झालं आहे. वीर दाससोबत या शर्यतीत फ्रान्सचा फ्लैम्ब्यू, अर्जेंटीनाचा एल एनकारगाडो आणि यूकेच्या 'डेरी गर्ल्स सीझन 3'चा समावेश आहे. एमी अॅवॉर्ड्सच्या नामांकनांची घोषणा झाल्याने चाहते कमेंट्स करत कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'एमी पुरस्कार 2023'कधी पार पडणार? (Emmy Awards 2023)
20 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय 'एमी पुरस्कार 2023'चं आयोजन करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. एकता कपूर यांनाही (Ekta Kapoor) या पुरस्कार सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांनी एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या