Jitendra Awhad Tweet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाचं दर्शन घेतलं. दरम्यान 'बिग बॉस ओटीटी'चा (Bigg Boss OTT) विजेता युट्यूबर एल्विश यादवने (Elvish Yadav) बाप्पाची आरती केली. एल्विशने बाप्पाची आरती केल्याने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) संतापले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान असं म्हणत त्यांनी ट्वीट केलं आहे. 


जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट काय आहे? (Jitendra Awhad Tweet)


एल्विश यादवने बाप्पाची आरती केल्याने जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,"एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्यूबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सरला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी, गणेश आरतीसाठी बोलवत असतील, तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे". 






एल्विश यादव पुढे म्हणाला,"महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत. याच्या मते, स्त्रियांना मेंदू कमी असतो, बाई फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते. तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य, शाहू महाराज, आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे". 


जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत वर्षा निवासस्थानी एल्विश यादव बाप्पाची आरती करतानाचा फोटोदेखील शेअर केला आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.  नेते मंडळी, सेलिब्रिटीही अनेक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचं दर्शन घेत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.


मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बॉलिवूड कलाकारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. जॅकी श्रॉफ, अदा शर्मा, काजल अग्रवाल, अर्जून रामपाल, पंकज त्रिपाठीसह, एल्विश यादव, ज्येष्ठ गायिका आशाताईंनीदेखील बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाच्या दर्शनासाठी सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र आले होते. वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतानाचे बॉलिवूड कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


संबंधित बातम्या


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाला दिग्गजांची हजेरी; शाहरुख-सलमान एकत्र, तर आशा भोसलेंनीही घेतलं बाप्पाचं दर्शन