Shah Rukh Khan Dunki Vs Prabhas Salaar : सिनेप्रेक्षकांसाठी डिसेंबर (December) महिना खूप खास आहे. या महिन्यात बड्या कलाकारांचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे वर्षाचा शेवट मनोरंजनमय असणार आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि दाक्षिणात्य सुपरस्टारचा 'सालार' (Salaar) हा सिनेमा डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शाहरुख आणि प्रभास आमने-सामने येणार असून 'डंकी' आणि 'सालार'मध्ये टक्कर होणार आहे. एकंदरीतच किसमें कितना है दम हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करण्यासाठी शाहरुख खानचा तिसरा सिनेमा 'डंकी' सज्ज आहे. 'मुन्नाभाई', '3 इडियट्स' आणि 'पीके' अशा सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलेले राजकुमार हिरानी या सिनेमाचं दिग्दर्शन करत होते. त्यामुळे 'डंकी' या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार असं म्हटलं जात आहे. 


प्रबासचा 'सालार' हा सिनेमा 28 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण आता निर्माते या सिनेमाची रिलीज डेट बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. ट्रेड एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार,'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रदर्शित होऊ शकतो. 'सालार'चा दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या पत्नीने इंस्टास्टोरी शेअर करत लिहिलं आहे,"डिसेंबर 2023 खास असणार आहे". 22 डिसेंबरला दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 


'सालार' आणि 'डंकी'मध्ये टक्कर


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा पॅन इंडिया स्टार आहे. हिंदीतही अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रभासचा आगामी 'सालार' हा सिनेमा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे शाहरुखचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत. दोन बडे ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे कलाकार आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहेत. 


'सालार' आणि 'डंकी' या सिनेमांची क्रेझ भारतासह परदेशातही आहे. शाहरुखच्या 'जवान' आणि 'पठाण' या सिनेमांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या यादीत 'डंकी' सिनेमाचाही समावेश होऊ शकतो. काही सिनेप्रेमी मात्र 'डंकी' आणि 'सालार' हे दोन्ही सिनेमे पाहणार आहेत.


संबंधित बातम्या


Jawan Poster On Truck: "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..."; ट्रकवर लिहिलाय 'जवान' मधील डायलॉग ; व्हिडीओ पाहून किंग खान म्हणाला...