एक्स्प्लोर

निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींवरील बायोपिक पाहिला, काय म्हणाला विवेक ओबरॉय...

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बॉयोपिकच्या संदर्भात झालेल्या गोंधळानंतर सिनेमामध्ये नरेंद्र मोदींची भूमिका करणाऱ्या विवेक ओबरॉय याने निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर विवेक ओबरॉय याने म्हटलं आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा सिनेमा पाहिला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर आयोगाकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. मी सध्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही मात्र निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आम्ही खुश आहोत, असे विवेकने म्हटले आहे. तो म्हणाला की, आम्हाला आशा आहे की या सिनेमाच्या प्रदर्शनाला लवकरच मंजुरी मिळेल कारण मोदींच्या या बायोपिकमध्ये कोणताही राजकीय अजेंडा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या  चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करणे आचारसंहितेचा भंग ठरेल, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. याप्रकरणी विरोधकांनी या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे म्हणत विरोधकांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करु नये, असे आदेश दिले आहेत. विरोधकांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर  09 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले होते. तसेच कोर्टाने याप्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते. त्यामुळे आज निवडणूक आयोगाला याप्रकरणी निर्णय घ्यावा लागला. दरम्यान,  सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'यू' सर्टिफिकेट देत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता. परंतु निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. संबंधित बातम्या
पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवरुन हटवला
पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला निवडणूक आयोगाचा दणका, निवडणूक काळात चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget