Shah Rukh Khan Dunki Teaser Out : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी (Shah Rukh Khan) चाहत्यांना मोठी भेट मिळाली आहे. अभिनेत्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'डंकी'चा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. त्याचा 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता अभिनेत्याच्या आगामी 'डंकी' या सिनेमाची (Shah Rukh Khan Upcoming Movie) प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


शाहरुखने शेअर केला 'डंकी'चा टीझर (Shah Rukh Khan Shared Dunki Teaser)


'डंकी' या सिनेमाचा टीझर शेअर करत शाहरुखने लिहिलं आहे,"स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या साध्या आणि वास्तविक लोकांची गोष्ट. मैत्री, प्रेम आणि नातं म्हणजेच कुटुंब. हृदयस्पर्शी कथाकाराची हृदयस्पर्शी कथा. या प्रवासाचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आमच्यासोबत याल. येत्या नाताळात 'डंकी' जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होईल".


'डंकी'चा टीझर कसा आहे? 


'डंकी'चा टीझर 1 मिनिट 48 सेकंदाचा आहे. पण या टीझरला शाहरुखने 'ड्रॉप 1' असे नाव दिले आहे. 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी शाहरुखचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. 'डंकी'च्या टीझरमध्ये शाहरुखसह विकी कौशलची (Vicky Kaushal) झलक पाहायला मिळत आहे. चाहत्यांना हे सरप्राईज आवडलं आहे.


'डंकी' कधी होणार रिलीज? (Dunki Release Date)


शाहरुखचा आगामी 'डंकी' हा सिनेमा रिलीज आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमात तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'डंकी' हा बहुचर्चित सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. 'डंकी' या सिनेमाला U सर्टिफिकेट मिळाले आहे. 'डंकी' या सिनेमात शाहरुख आणि तापसीसह विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू आणि सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


शाहरुख अन् प्रभास आमने-सामने


शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाची दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत (Prabhas) टक्कर होणार आहे. शाहरुखचा 'डंकी' 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून प्रभासचा 'सालार' (Salar) 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही बिग बजेट सिनेमे असून दोन्ही सिनेमांसाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा बाजी मारणार हे पाहावे लागेल.


Shah Rukh Khan film Dunki Teaser VIDEO 



संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : शाहरुखचा वाढदिवस अन् चाहत्यांचा जल्लोष, मन्नबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, फटाक्यांची आतषबाजी; किंग खानचं मध्यरात्री ट्वीट