Drishyam 2 Twitter Reaction: बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अजय त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. 2015 मध्ये रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथानकाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'दृश्यम 2' (Drishyam 2) चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी या ट्रेलरला कमेंट करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


एका युझरनं ट्रेलरला कमेंट केली, 'या चित्रपटाचा ट्रेलर वेगळ्याच लेव्हलचा आहे. पाहून अंगावर शहारे आले.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दृश्यम-2 चा ट्रेलर जबरदस्त आहे. सात वर्षानंतर केस पुन्हा ओपन झाली आहे. आता 18 नोव्हेंबरची वाट बघत आहे.' 'अजय देवगण यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत', अशी कमेंट देखील एका युझरनं केली. 





पाहा ट्रेलर: 




कधी रिलीज होणार चित्रपट? 


दृश्यम-2 हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केलं आहे. दृश्यमच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्याचं 2020 मध्ये निधन झालं. 'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Drishyam 2 Trailer : सात वर्षांनी अजय देवगण दिसणार विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 2'चा ट्रेलर रिलीज