Drishyam 2 Trailer Release : 'दृश्यम' या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमाच्या यशानंतर चाहते 'दृश्यम 2'ची (Drishyam 2) प्रतीक्षा करत होते. आता निर्मात्यांनी 'दृश्यम 2'चा ट्रेलर आऊट केला आहे. सोशल मीडियावर 'दृश्यम 2'चा ट्रेलर चर्चेत आहे. 

Continues below advertisement


अजयने सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"खरं हे झाडाच्या मुळाप्रमाणे असतं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस बाहेर येतंच". 'दृश्यम 2'चं पोस्टर आणि ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. 'दृश्यम 2'चा ट्रेलर चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. 






'दृश्यम 2' कधी होणार प्रदर्शित?


'दृश्यम 2'चं नवं पोस्टर रिलीज होण्याआधी या सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर आऊट करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. अजय देवगन स्टारर 'दृश्यम 2' हा सिनेमा पुढील महिन्यात 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर 17 ऑक्टोबरला (उद्या) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'दृश्यम 2'मध्ये अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा ''दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अभिषेत पाठक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.  


'दृश्यम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन सात वर्ष झाली आहे. तब्बल सात वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2015 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याआधी 'दृश्यम 2'च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजयने लिहिलं होतं,विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का?". 


संबंधित बातम्या


Drishyam 2 Released Date : अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला