Mrinal Kulkarni Birthday : मराठी चित्रपट आणि मालिकाच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांचा आज (21 जून) वाढदिवस आहे. ‘सोनपरी’ बनून अवघ्या चिमुकल्यांचं विश्व व्यापून टाकलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या अनेक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. मृणाल कुलकर्णी यांचा जन्म 21 जून 1971 रोजी पुण्यात झाला. मालिकांव्यतिरिक्त मृणाल अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्येही झळकल्या आहेत.


मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ‘स्वामी’ या मराठी मालिकेतून पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे माधोराव यांच्या पत्नी रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती. लहानपणापासून अभिनय करत असूनही, मृणाल यांना अभिनयात फारसा रस नव्हता. सुरुवातीला त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्त्यावर लक्ष केंद्रित करायचे होते. दरम्यान, त्यांना सतत अभिनयाच्या ऑफर्स येत होत्या. त्यानंतर 1994मध्ये मृणाल यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.


मराठीच नव्हे, हिंदी विश्वही गाजवले!


मृणालने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले. त्यापैकी ‘श्रीकांत’, ‘द ग्रेट मराठा’, ‘द्रौपदी’, ‘हसरते’, ‘मीराबाई’, ‘टीचर’, ‘स्पर्श’ आणि ‘सोनपरी’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मालिकाच नव्हे, तर मृणाल कुलकर्णी जाहिरात विश्वातीलही एक प्रसिद्ध चेहरा बनल्या होत्या. जाहिरातींमुळे मृणाल यांना अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिकांच्या ऑफर आल्या होत्या.


मृणाल यांनी ‘जमलं हो जमलं’, ‘घराबाहेर’, ‘लेकरू’, थांग’, ‘जोडीदार’ अशा मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी ‘कमला की मौत’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘वीर सावरकर’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘आशिक’, ‘मेड इन चायना’ आणि ‘राम गोपाल वर्मा की आग’ या हिंदी चित्रपटांतही निवडक भूमिका केल्या आहेत. अभिनय विश्व गाजवणाऱ्या मृणाल कुलकर्णीने दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता.


‘जिजाऊ’ बनून करतायत प्रेक्षकांचं मनोरंजन


मृणाल यांनी मित्र रुचिर कुलकर्णी यांच्यासोबतच लग्नगाठ बांधी होती. या जोडीला एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. मृणाल कुलकर्णी या सध्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट सीरीजमध्ये ‘जिजाऊं’ची भूमिका साकारत आहेत.


हेही वाचा :


Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी यांची प्लॅनेट मराठी ओटीटी परिवारात एन्ट्री


PHOTO : होणाऱ्या सासूबाईंसोबत शिवानी रांगोळेचं खास फोटोशूट! पाहा फोटो...