Rocketry- The Nambi Effect : अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याच्या  रॉकेट्री: द नांबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रॉकेट्री: द नांबी इफेक्ट या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) एक कॅमियो रोल साकारणार आहे. तो या चित्रपटामध्ये पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये आर माधवननं शाहरुखच्या भूमिकेची माहिती दिली. 


रॉकेट्री: द नांबी इफेक्ट या चित्रपटाचे प्रमोशन सध्या आर माधवन करत आहे. प्रमोशन दरम्यान आर माधवन सांगितलं होतं की, शाहरुख या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारणार आहे. त्यानं या भूमिकेसाठी मानधन घेतलं नाही. पुढे तो म्हणाला, 'मी शाहरुखसोबत झिरो या चित्रपटमध्ये काम करत होतो. त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुखनं रॉकेट्री या चित्रपटामध्ये काम करण्याची त्याची इच्छा व्यक्त केली. तो मला म्हणाला होता की, मला बॅकग्राउंड रोल देखील चालेल पण मला या चित्रपटामध्ये काम करायचे आहे.'


आर. माधवननं सांगितलं, 'शाहरुख आणि अभिनेता सूर्या या दोघांनी देखील या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मानधन घेतलेलं नाही. कॉस्ट्यूम, असिस्टेंट कोणत्याच गोष्टींचे मानधन शाहरुखनं घेतलं नाही. ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट 1 जुलै रेजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रॉकेट्री चित्रपटाचा प्रीमियरही झाला. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून त्यानं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


हेही वाचा: