Dream Girl 2 teaser:  यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 2023 ची सुरुवात 'पठाण' (Pathaan) या सुपरहिट चित्रपटानं झाली. आता लवकरच ‘ड्रीम गर्ल 2’ हा (Dream Girl 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) ड्रीम गर्ल या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये पठाण म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आवाज ऐकू येत आहे. 


ड्रीम गर्ल-2 च्या टीझरमध्ये आयुष्मान हा पूजाच्या लूकमध्ये दिसत आहे.  बॅकलेस लहेंगा आणि ज्वेलरी अशा लूकमध्ये आयुष्मान दिसत आहे. हा टीझर आयुष्माननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझरला आयुष्माननं कॅप्शन दिलं, 'ब्रेकिंग न्यूज ड्रीम गर्ल पूजा परत आली आहे! सात को साथ में देखेंगे.  'ड्रीम गर्ल-2' चित्रपट  7 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.' ड्रीम गर्ल-2 च्या टीझरमध्ये शाहरुख हा त्याच्या जवान या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. 


पाहा टीझर






ड्रीम गर्लचा सिक्वेल


'ड्रीम गर्ल- 2' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'ड्रीम गर्ल- 2' मध्ये आयुष्मानसोबतच  अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बनर्जी आणि मनजोत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा चित्रपट राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूरनं केली आहे. 


शाहरुखचा जवान चित्रपट


शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट हिट ठरला. आता त्याच्या जवान या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ॲटलीनं जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जवान चित्रपटामध्ये विजय सेतूपती प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट 2 जून  2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच शाहरुखचा डंकी हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Pathaan Box Office Collection: 500 कोटींच्या क्लबकडे पठाणची वाटचाल; 19 व्या दिवशी केली एवढी कमाई