Dream Girl 2: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) चाहता वर्ग मोठा आहे. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  ड्रीम गर्ल चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच  'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ आयुष्माननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'किसी का भाई किसी का जान'  (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)

  या चित्रपटामधील अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आवाज ऐकू येत आहे.


आयुष्मान खुरानानं  'ड्रीम गर्ल 2' यी चित्रपटाचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान हा 'ड्रीम गर्ल 2' मधील पूजासोबत फोनवर गप्पा मारताना दिसत आहे. पूजाला सलमान म्हणतो, 'पूजा तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही.' या व्हिडीओमध्ये पूजा ही रेड साडी, हातात गुलाब आणि गळ्यात माळ, अशा लूकमध्ये दिसत आहे. 'ड्रीम गर्ल 2' मध्ये पूजा ही भूमिका अभिनेता आयुष्मान साकारणार आहे. 


पाहा व्हिडीओ: 






'ड्रीम गर्ल- 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस


'ड्रीम गर्ल- 2' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'ड्रीम गर्ल- 2' मध्ये आयुष्मानसोबतच  अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बनर्जी आणि मनजोत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 'ड्रीम गर्ल- 2' या चित्रपटाची अजून रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.


सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' झाला रिलीज


'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


 इतर महत्वाच्या बातम्या:


Dream Girl 2 teaser: ...जेव्हा 'व्हॅलेंटाईन-डे' निमित्त 'पठाण' पूजाला करतो कॉल; 'ड्रीम गर्ल-2' चा टीझर पाहिलात?