Double XL Teaser:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध  अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की वाढलेलं वजनामुळे हुमा आणि सोनाक्षी यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत. 


ट्रेलरच्या सुरुवातीला दिसत आहे की हुमा ही एका पार्टीमध्ये क्रिकेटर शिखर धवनसोबत डान्स करत आहे. हुमानं या चित्रपटात राजश्री त्रिवेदी ही भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की अचानक राजश्रीची आई तिला झोपेतून उठते. त्यानंतर  राजश्रीसोबतच सोनाक्षीच्या आयुष्याबाबत देखील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. सोनाक्षीनं या चित्रपटात सायरा खन्ना ही भूमिका साकारली आहे. सायराचा बॉयफ्रेंड हा तिच्या वजनामुळे तिला धोका देतो. या सगळ्यामध्ये  सायरा  आणि राजश्री यांची मैत्री होते आणि मग दोघी वाढलेल्या वजनाबाबत चर्चा करतात. त्या दोघींची मैत्री देखील ट्रेलरमध्ये दिसते. या चित्रपटामधून शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 


पाहा ट्रेलर: 



तगडी स्टार कास्ट






 

सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: