Badshah: प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाह सध्या एमटीव्ही (MTV) वरील हसल 2.0 (Hustle 2.0) या शोनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बादशाह सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बादशाह हा एका पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. कोण आहे अभिनेत्री? ते जाणून घेऊयात...
बादशाहच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री?
बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या नात्याबाबात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 2012 पासून ईशा ही अभिनयक्षेत्रात काम करत आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या नवाबजादे या चित्रपटात ईशानं प्रमुख भूमिका साकारली.
जॅस्मिनसोबत विभक्त झाला बादशाह
2012 मध्ये बादशाहनं जॅस्मिनसोबत लग्नगाठ बांधली. 2017 मध्ये जॅस्मिन आई-वडील झाले. त्यांना एक मुलगी झाली. मुलीचं नाव त्यांनी जेसी ग्रेस असं ठेवलं. लॉकडाऊन दरम्यान जॅस्मिन आणि बादशाह यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर जॅस्मिन तिच्या मुलीला घेऊन लंडनला गेली. बादशाह आणि जॅस्मिन दोघे विभक्त झाले.
पाहा ईशाचे फोटो:
बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. डीजे वाले बाबू, लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: