Elnaaz Norouzi:   इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता हिजाब विरोधी चळवळीचं लोण जगभरात पसरलं आहे.  विविध सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन इराणमधील हिजाब प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. नुकताच सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिनं महिलांच्या अधिकारांबद्दल आणि हक्कांबद्दल भाष्य केलं आहे.  


एलनाज नौरोजीने शेअर केला व्हिडीओ
एलनाज नौरोजीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं हिजाब परिधान केलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती हिजाब काढते. व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'प्रत्येक स्त्रीला तिला पाहिजे ते परिधान करण्याचा अधिकार असला पाहिजे. जगात कुठेही ती असली तरी ती हवे ते कपडे परिधान करु शकते. कोणताही पुरुष किंवा स्त्री कोणत्याही महिलेच्या ड्रेसचा विरोध करु शकत नाही.'


एलनाज म्हणाली,'मी न्यूडिटीचं समर्थन करत नाही'
पुढे कॅप्शनमध्ये एलनाजनं लिहिलं, 'प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. एकमेकांच्या विचाराचा सन्मान करा. लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती… प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या शरीराबाबत निर्णय घेण्याची शक्ती असली पाहिजे! मी न्यूडिटीचं समर्थन करत नाही.'


पाहा व्हिडीओ: 






कोण आहे एलनाज? 
एलनाज ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एलनाजचे कुटुंब इराणमध्ये राहते. एलनाजनं सॅक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये जोया मिर्झा ही भूमिका साकरली. 10 वर्षांहून अधिक काळ तिनं आंतरराष्ट्रीय मॉडेल म्हणून काम केले आहे.


अटकेतील महिलेच्या मृत्यूनंतर आंदोलनाला सुरुवात


महसा अमिनी नावाच्या मुलीला हिजाब न परिधान केल्या प्रकरणी इराणच्या पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिची तब्येत इतकी बिघडली आणि ती कोमात गेली, त्यानंतर महसा अमिनीचा मृत्यू झाला. पोलिस अटकेत असताना या महिलेचा मृत्यू झाल्यानं महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Iran Hijab Protest: भर कार्यक्रमात गायिकेनं कापले केस; हिजाब विरोधी आंदोलनाला दिला पाठिंबा