एक्स्प्लोर

Lata Mangeshkar: 'सम्राज्ञी'; लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा

सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध  संगीतकार मयुरेश पै  हे करणार आहेत. 

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज जयंती आहे. जगभरातील चाहते आज लता दिदींना आदरांजली वाहत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला. लता दीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध  संगीतकार मयुरेश पै  हे करणार आहेत. 

लतादीदींचा जीवनपट उलगडणार 'सम्राज्ञी'डॉक्युमेंटरी

लतादीदींच्या जन्मदिनी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि  लतिका क्रिएशन्स हे सम्राज्ञी या माहितीपटाची निर्मिती करणार आहेत. लतादीदींचा जीवनपट उलगडणारी ही डॉक्युमेंटरी असणार आहे. मराठीतील  अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) या दोघांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै (Mayuresh Pai) दिग्दर्शित करत आहेत. स्वरसम्राज्ञीला या कलाकृतीतून मानाचा मुजरा  करण्याचा हा प्रयत्न आहे.

लता मंगेशकरांचा 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कवर जाऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Gujarati Woman On Aadi Anant: 'मी गुजराती आहे, पण मराठी माणसंच...', 'आदी अनंत' सिनेमा बघायला गेलेल्या गुजराती तरुणीची नाराजी
'मी गुजराती आहे, पण मराठी माणसंच...', 'आदी अनंत' सिनेमा बघायला गेलेल्या गुजराती तरुणीची नाराजी
Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
Jalgaon Crime News : जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणानं संतापाचं टोक गाठलं, डॉक्टरचा बळी घेत मृतदेह पोत्यात भरून जळगावच्या बहुळा धरणात फेकला; पाच दिवसांनंतर थरारक घटनेचा छडा
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
BDO कडून उपोषणकर्त्याचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, चौकशी करू
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
मोठी बातमी! मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाण्याची नासाडी केल्यास 2000 रुपये दंड; नगरपालिकेचा निर्णय
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
मोठी बातमी: गोकुळच्या माजी संचालकाच्या लेकाने दोघांना उडवलं, दोन्ही भावांचा जागेवर मृत्यू, मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Embed widget